धक्कादायक ! प्रियकराच्या मित्रासोबत संबंध ठेवण्यास विवाहितेने नकार देताच तिची दगडाने ठेचून हत्या

murder
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मंचर : हॅलो महाराष्ट्र – मंचर या ठिकणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यामुळे राग अनावर झालेल्या प्रियकराने त्या महिलेची दगडाने ठेचून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर प्रियकराने तिचा मृतदेह आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावाच्या हद्दीत टाकून दिला होता. यामुळे या गावात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकर आणि त्याच्या मित्राला अटक केली आहे. या दोन्ही आरोपींना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण
अटक केलेल्या आरोपीचे नाव सुनील बबन भुंताबरे आणि शिवनाथ गावबा असे असून हे दोघे जुन्नर तालुक्यातील मांजरवाडी येथील रहिवासी आहेत. तर मृत महिला रांजणी याठिकाणी बाजरी पिकाचे राखण करण्यासाठी आली होती. तेव्हा तिची ओळख आरोपी सोबत झाली. यानंतर या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. यादरम्यान आरोपी प्रियकर मृत विवाहित महिलेवर आपल्या मित्राशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत होता. पण तिने असे करण्यास नकार दिला होता.

यानंतर या महिलेने आपल्या मित्रासोबत शारीरिक संबंध ठेण्यास नकार दिल्यामूळे आरोपी प्रियकराला राग अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात त्याच्या साथीदाराने संबंधित महिलेच्या डोक्यात दगडाने हल्ला करत तिची हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावाच्या हद्दीत टाकून तेथून पळ काढला. यानंतर गावकऱ्यांनी हा मृतदेह पाहून या घटनेची माहिती मंचर पोलिसांना दिली.

या प्रकरणी मृत महिलेच्या आई नंदाबाई पोपट केदार यांनी आपल्या मुलीच्या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात मंचर पोलिसांत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी प्रियकरासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. यानंतर आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.