हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पेट्रोल डिझेलच्या (Marut E-Tract 3.0) वाढत्या किमतीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर देत आहेत. आत्तापर्यंत तुम्ही इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक रिक्षा पहिली असेल पण आता इलेक्ट्रिक ट्रॅक्टर सुद्धा लवकरच वापरात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचण्यास मदत होणार आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला Marut E-Tract 3.0 नाव देण्यात आलं आहे.
मारुत ई-ट्रॅक्ट 3.0 हा गुजरातमधील शेतकरी- अभियंता (Marut E-Tract 3.0) निकुंज कोरात आणि त्याच्या भावांनी सुमारे 1 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने विकसित केलेला एक छोटासा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरला iCAT चे प्रमाणपत्र मिळाले असून या ट्रॅक्टरची किंमत 5.5 लाख रुपये असणार आहे. आज आपण जाणून घेऊया या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे खास फीचर्स…
हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर एका चार्जवर 6 ते 8 तास काम करू शकतो. निकुंजच्या दाव्यानुसार फुल्ल ट्रॅक्टर चार्ज होण्यासाठी ४ तासांचा वेळ लागतो. एखादा छोटा डिझेल ट्रॅक्टर जी जी कामे करू शकतो ती सर्व कामे हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टरही करू शकतो. हा मिनी ट्रॅक्टर अवघ्या 10 रुपयांमध्ये एक तास शेतात काम करू शकतो.
बॅटरी क्षमता – (Marut E-Tract 3.0)
रेंज निकुंजच्या म्हणण्यानुसार, हे 4 तासांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. त्यांचा असा दावा आहे की “छोटा डिझेल ट्रॅक्टर काहीही करू शकतो, मारुत ई-ट्रॅक्ट 3.0 करू शकतो. या ट्रॅक्टरमध्ये रीजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टमसह 11kWh बॅटरी पॅक वापरला गेला आहे. त्याची इलेक्ट्रिक मोटर 3KW क्षमतेचे पॉवर आउटपुट देते. या ट्रॅक्टरच्या बॅटरीवर 3 वर्षे किंवा 3,000 तासांची वॉरंटी दिली जात आहे आणि इलेक्ट्रिक मोटरसाठी 2,000 तासांची वॉरंटी दिली जात आहे.
80 रूपयांत होणार फुल्ल चार्ज-
या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरी चार्ज करण्यासाठी एकूण 10 युनिट वीज वापरली जाते. त्यानुसार कोणत्याही भागात, प्रति युनिट विजेचा दर जरी 8 रुपये ठेवला तरी हा ट्रॅक्टर चार्ज होण्यासाठी फक्त 80 रुपये खर्च लागेल. त्याचवेळी इतर डिझेल ट्रॅक्टरची तुलना करायचं म्हंटल तर ६ तास काम करण्यासाठी ट्रॅक्टरला जवळपास 6 लिटर इंधन लागते त्यासाठी तुम्हाला 500- 550 रुपये खर्च करावा लागू शकतो. त्यामुळे या इलेक्ट्रिक ट्रॅक्टर मुळे शेतकऱ्यांचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.
किंमत –
हा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नाही, परंतु याची किंमत 5.5 लाख रुपयांपासून सुरू होईल. तसेच इलेक्ट्रिक वाहने आणि कृषी वाहनांवर सरकारने दिलेल्या सवलतींचा समावेश केल्यास त्याची किंमत आणखी कमी होऊ शकते.