नवी दिल्ली । जर तुम्ही मारुती सुझुकीची नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर फक्त दोनच दिवस वाट पहा. वास्तविक, कंपनी 21 एप्रिल रोजी XL स्पेससह XL6 कारचे नवीन मॉडेल लॉन्च करणार आहे. मारुतीची ही कार 6 सीटर आहे. वेबसाइट किंवा शोरूममध्ये 11 हजाराची टोकन रक्कम भरून ग्राहक ती बुक करू शकतात.मारुती सुझुकीची ही कार पूर्वीपेक्षा आणखी लक्झरी असून यात अनेक नवीन आणि एडवांस्ड फीचर्सही पाहायला मिळतील.
बलेनो प्रमाणे 360 डिग्री कॅमेरा उपलब्ध असेल
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, XL6 मध्ये Baleno सारखा 360-डिग्री कॅमेरा मिळेल. म्हणजेच याद्वारे कारच्या आतील स्क्रीनवर सर्व दृश्य दिसेल. या फीचर्सच्या मदतीने कारला पाठीमागे घेणे किंवा पार्क करणे सोपे होईल. यात सर्व-नवीन इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील मिळेल. मात्र, त्याच्या स्क्रीनच्या साईज बद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही. कारचे इंटीरियर सुधारण्यासाठी बॅजिंग लाइट्स देखील असू शकतात.
16-इंच मोठे आणि मजबूत अलॉय मिळतील
XL6 ला पुन्हा डिझाइन केलेले 16-इंच मजबूत आणि मोठे अलॉय व्हील्स मिळतील. या अलॉयमुळे कारचा लूक तर छान दिसेलच मात्र त्याबरोबरच कारलाही मजबुती देखील मिळेल. अलॉयमध्ये ड्युअल टोनचा पर्यायही उपलब्ध असेल. कारच्या पुढील ग्रिलमध्येही सुधारणा करण्यात आली आहे. या नवीन मॉडेलमध्ये ते बंपरशी चांगले जोडले गेले आहे. XL6 च्या अधिकृत टीझरनुसार, यामध्ये अनेक कनेक्टेड फीचर्स उपलब्ध असतील. स्मार्टफोन एपच्या मदतीने तुम्ही कार अनलॉक करू शकाल. यामध्ये तुमच्याकडे चावी नसेल तरीही तुम्ही फोनवरूनच इंजिन सुरू करू शकाल. यामध्ये 1.5-लिटर ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन उपलब्ध होईल.
मारुती सुझुकीचे नवीन K15C 1.5-लिटर ड्युअल-जेट पेट्रोल इंजिन या मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) उपलब्ध असेल. K15B 1.5-लिटर इंजिन सध्याच्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे. नवीन इंजिन 115hp पॉवर जनरेट करेल. हे 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल. जुन्या मॉडेलला 4-स्पीड गिअरबॉक्स मिळेल. ड्युएल-जेट टेक्नोलॉजीमुळे याला मायलेजही चांगले मिळेल, असे मानले जात आहे.
नवीन XL6 ची किंमत
XL6 च्या नवीन मॉडेलच्या किंमतीशी संबंधित माहिती समोर आलेली नाही. सध्याच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 10.14 लाख ते 12.02 रुपये आहे. मात्र, काही रिपोर्ट्सनुसार, कंपनी नवीन मॉडेलच्या बेस व्हेरिएंटच्या किंमतीत फारसा फरक करणार नाही, मात्र टॉप व्हेरिएंटची किंमत जास्त असेल. भारतीय बाजारात नवीन XL6 ची स्पर्धा Kia Carnes, Mahindra Marazzo शी आहे. त्याच वेळी, टॉप एंड व्हेरियंट थेट टोयोटाच्या इनोव्हा क्रिस्टाशी स्पर्धा करते.