Tuesday, June 6, 2023

“मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊनच राज्यात अस्थिरता आणण्याचा प्रयत्न” – रोहित पवार

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात सध्या जी परिस्थितीत निर्माण केली जात आहे हा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन सर्व केले जात आहे. यापूर्वी राज ठाकरे यांच्या भाषणात युवकांचे, बेरोजगारीचे मुद्दे होते. आता त्यांची भाषणे पहिली तर कुठेतरी भाजपचे म्हणणे मांडत आहेत. धर्म हा विषय व्यक्तिगत आहे, त्याचे जर तुम्ही राजकारण करत असाल, व्यक्तिगत लाभासाठी धर्माचा वापर करत असाल तर महाराष्ट्रातील जनता हि उत्तर प्रदेशातील जनता नाही अशी टीका राष्ट्रवादीचे आमदार व युवानेते रोहित पवार यांनी केली. तसेच उत्तर प्रदेश मध्ये जसे जातीचे राजकारण केले जाते तीच पद्धत जर तुम्ही महाराष्ट्रात आणत असाल तर जनता तुम्हाला जागा दाखवेल असा इशाराही यावेळी पवार यांनी दिला.

सांगलीतील अहिल्यादेवी होळकर स्मारकाला आमदार रोहित पवार यांनी भेट दिली. यावेळी धनगर समाजाच्या वतीने रोहित पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, नगरसेवक विष्णू माने, मनोज सरगर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले,”मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. ज्या गोष्टी भाजपचे सरकार असताना सुद्धा करता आल्या असत्या. मात्र, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी हा विषय काढला नाही, त्यांच्या कार्यकर्त्यांनी हा विषय काढला नाही. आता महाविकास आघाडीचे सरकार असताना मुंबईची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन हे सर्व विषय काढत आहेत. आज प्रामुख्याने युवकांबाबत बोलण्याची आवश्यकता आहे, महागाई, सामान्य माणूस यावर बोलण्याची आवश्यकता आहे.”

“धर्म हा विषय व्यक्तिगत आहे, त्याचे जर तुम्ही राजकारण करत असाल, व्यक्तिगत लाभासाठी धर्माचा वापर करत असाल तर महाराष्ट्रातील जनता हि उत्तर प्रदेशातील जनता नाही, त्यांना सर्व गोष्टी कळत असतात. लोकशाही मध्ये लोक या विचारांच्या विरोधातच भूमिका घेतात हे कोल्हापूरच्या नवडणुकीतून स्पष्ट झाले आहे.” गेल्या 55 वर्षात शरद पवारांविरोधात भाजपसह इतर नेते विरोधात बोलत आले आहेत. यापूर्वी राज ठाकरे यांच्या भाषणात युवकांचे, बेरोजगारीचे मुद्दे होते. आता त्यांची भाषणे पहिली तर कुठेतरी भाजपचे म्हणणे मांडत आहेत. जर तुम्ही भाजपची बाजू घेत असाल तर पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव, महागाई यावर ते बोलत नाहीत असा टोला पवार यांनी लगावला.