Maruti Suzuki : लवकरच बाजारत येतेय SWIFT चं नवीन माॅडेल; जबरदस्त फिचर्स अन् कमालीचं इंजिन, किंमत किती?

Maruti Suzuki
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील लोकप्रिय कार उत्पादन कंपनी म्हणून मारुती सुझुकीचे (Maruti Suzuki) नाव आघाडीवर आहे. खास करून देशातील मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये मारुती सुजूकीच्या गाड्याची क्रेज जास्तच पहायला मिळते. याचे कारण म्हणजे मध्यमवर्गातील लोकांना ज्याप्रकारच्या गाड्यांची अपेक्षा असते अशीच गाडी कंपनी आत्तापर्यंत बनवत आलीये. आताही मारुती सुजूकी आपल्या सर्वात लोकप्रिय कार स्विफ्टचे (Maruti Swift) नवं मॉडेल बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. स्विफ्टच्या या अपडेटेड मॉडेल मध्ये तुम्हाला खास फीचर्स आणि दमदार इंजिन पहायला मिळेल.

शक्तीशाली इंजिन-

मीडिया रिपोर्ट्सनुसार मारुती सुजूकीकडून आपल्या स्विफ्ट कारचा लूक बदलला जाणार आहे. मात्र कंपनीकडून याबाबत अद्याप अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली गेली नाही. परंतु ही कार 1 लीटरच्या टर्बो इंजिनने आणखी शक्तिशाली बनवली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच हे 3 सिलिंडर बूस्टरजेट इंजिन 100 bhp आणि 147.6 Nm टॉर्क जनरेट करते. मारुती स्विफ्ट ला देण्यात येणारे हे इंजिन बलेनो आणि जिमनी यांसारख्या गाड्यांमध्येही देण्यात आले आहे. यासोबतच कंपनी कडून 5 गिअर मॅन्युअल आणि 6 स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन मिळतील.

फीचर्स-

गाडीच्या फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास, मारुती सुजूकीच्या या नवीन स्विफ्टमध्ये 360 डिग्री कॅमेऱ्या सोबतच 9 इंचाचा स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टीम मिळेल. गाडीत बसून चांगल्या म्युजिकचा आनंद घेण्यासाठी ARKAMYS सराउंड साउंड मिळण्याची शक्यता आहे. तसेच कारमधील AC व्हेन्ट्स आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर नवीन मिळू शकतात. सेफ्टी साठी या कारमध्ये तुम्हांला 6 एअर बॅग्ज मिळतील. यासोबतच सेफ्टी बेल्ट रिमाइंडर, क्रूझ कंट्रोल, स्पीड अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, बँक कॅमेरा, सारखे फीचर्सही देण्यात आले आहेत.

किंमत किती?

मारुती सुझुकीने या नवीन स्विफ्टची किंमत किती असेल हे अजून जाहीर केलेलं नाही, परंतु कंपनी लवकर या गाडीची किंमत जाहीर करू शकते.