मारुती सुझुकीचा नववर्षात मोठा धमाका ! लॉंच करणार ‘या’ 4 दमदार कार; पहा यादी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Upcoming Maruti Cars In 2024 : देशात मारुती सुझुकी अनेक नवनवीन कार बाजारात घेऊन येत असते. या कार मध्यमवर्गीयांसाठी खूप परवडणाऱ्या आहेत. जर तुम्हीही सुझुकीचे चाहते असाल आणि नवीन कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण नववर्षात मारुती सुझुकी बाजारात चार जबरदस्त कार लॉन्च करणार आहे, ज्या तुम्हाला खूप परवडणाऱ्या आहेत.

सध्या भारतीय बाजारात मारुती सुझुकीच्या ग्रँड विटारा, फ्रँक्स आणि जिमनी या गाड्यांना खूप या मिळाले आहे. लोकांनी या गाड्यांना खूप पसंत केले आहे. आता हाच हेतू पुढे कायम ठेवण्यासाठी कंपणी आणखी नवीन कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये, ती किमान 4 कार लॉन्च करेल, त्यापैकी दोन SUV (एक इलेक्ट्रिक), एक हॅचबॅक आणि एक लहान सेडान असेल. जाणून घ्या या चारही कारबद्दल…

नवीन स्विफ्ट आणि डिझायर

मारुती सुझुकी नवीन जनरेशन स्विफ्ट हॅचबॅक आणि डिझायर सबकॉम्पॅक्ट सेडान लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हे दोन्ही फेब्रुवारी ते एप्रिल 2024 दरम्यान बाजारात येऊ शकतात. दोन्ही वाहने ब्रँडच्या नवीनतम 1.2L, 3-सिलेंडर Z12E पेट्रोल इंजिनने CVT गिअरबॉक्सशी जोडलेली असण्याची अपेक्षा आहे. नवीन स्विफ्टच्या जागतिक मॉडेलमध्ये हायब्रीड पॉवरट्रेनचा पर्याय आहे. येथे देखील ते हायब्रिड आणि नॉन-हायब्रिड पर्यायांमध्ये आणले जाऊ शकतात. यामध्ये लाइट डिझाईन अपडेट्स देखील दिसू शकतात.

7-सीटर SUV

बाजारात कंपनी एक 7-सीटर SUV आणण्याच्या तयारीत आहे. मात्र, मारुती सुझुकीने याबाबत अधिकृत खुलासा केलेला नाही. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, असे समजते की 2024 च्या उत्तरार्धात 7-सीटर प्रीमियम SUV लाँच करू शकते, जी Grand Vitara SUV वर आधारित असेल. हे प्लॅटफॉर्म, वैशिष्ट्ये आणि पॉवरट्रेन ग्रँड विटारासोबत शेअर करू शकते.

eVX इलेक्ट्रिक SUV

मारुती सुझुकी भारतीय बाजारपेठेसाठी इलेक्ट्रिक एसयूव्हीची चाचणी करत आहे. ही आगामी इलेक्ट्रिक SUV eVX संकल्पनेवर आधारित असेल, ज्याचा प्रोटोटाइप 2023 ऑटो एक्सपोमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. हे पूर्णपणे नवीन स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर तयार केले जाईल. त्याची लांबी अंदाजे 4.3 मीटर आहे. 2024 च्या सणासुदीच्या हंगामात हे लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. त्याची श्रेणी 500 किमी पेक्षा जास्त असू शकते. अशा प्रकारे या चारही कार तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरणार आहेत.