Maruti Vitara Brezza : Tata-Hyundai ला टक्कर देण्यासाठी मारुती घेऊन येणार नवीन SUV

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  Maruti Vitara Brezza  : भारतात सर्वाधिक कार विकणाऱ्या कंपन्यांमध्ये मारुती सुझुकीचा पहिला क्रमांक आहे. मल्टी पर्पज व्हेईकल (MPV) आणि हॅचबॅकच्या विक्रीमध्ये इतर कोणत्याही कंपन्या मारुतीचा हात धरू शकलेल्या नाहीत. मात्र, मारुती सुझुकीला अद्यापही SUV सेगमेंटमध्ये आपली छाप पाडता आलेली नाही. Tata Nexon आणि Hyundai Creta ची SUV सेगमेंटमध्ये घट्ट पकड आहे. मारुतीकडेही या सेगमेंटमधील Vitara Brezza आहे, मात्र Tata आणि Hyundai च्या तुलनेत ती थोडी कमीच दिसते. अशा परिस्थितीत आता मारुती Brezza च्या मदतीने या सेगमेंटमध्येही अव्वल स्थान पटकवण्याची तयारी करत आहे.

याचमुळे 2022 मध्ये मारुती Vitara Brezza नवीन मेकओव्हरसह लाँच करणार आहे. नुकतेच या नवीन मॉडेलचे काही फोटो देखील समोर आले आहेत. वास्तविक, सायबर सिटी, गुडगावमध्ये मारुती Vitara Brezza चे अधिकृत TVC शूटिंग होत होते. जिथे या मॉडेलचा गुप्तपणे फोटो काढण्यात आला होता. यावेळी लाल कलर असलेल्या गाडीचे शूटिंग केले जात होते. Maruti Vitara Brezza

Maruti Suzuki to focus on SUVs and EVs to regain market share: CEO

>> हे नवीन मॉडेल आणखी बोल्ड आणि आकर्षक असेल असे या फोटोंवरून स्पष्ट होत आहे. तसेच ही नवीन गाडी जूनमध्ये लॉन्च केली जाऊ शकेल असेही मानले जात आहे. या TVC शूटसाठी लाल आणि निळा रंग असलेल्या गाड्या वापरण्यात आलेल्या होत्या. या दोन्ही कलर व्हेरियंटमध्ये कारचे छत काळे होते. म्हणजेच दोन्ही मॉडेल्स ड्युअल कलर टोनचे होते.

>> या नवीन मॉडेलला आता मारुती Brezza असे नाव दिले जाईल. नुकत्याच लाँच झालेल्या Baleno प्रमाणे, Brezza 2022 मध्ये एक नवीन फ्रंट ग्रिल आणि टेल सेक्शन देखील असेल. यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे समोर उपलब्ध असणारी नवीन ग्रिल हॉरिजोंटल क्रोम सेट्ससह येईल. याने बाणाच्या आकाराच्या हेडलाइट्समध्ये क्रोम मर्ज केले आहे. Maruti Vitara Brezza

India's 6 Popular Cars To Get A Generation Change

>> या नवीन मॉडेलच्या बंपरमध्येही मोठा बदल पाहायला मिळत आहे. मारुती सुझुकीने बंपरला आणखी बोल्ड बनवण्यासाठी ते री-डिझाइन केले असल्याचे दिसून येते. ते ट्विन DRLs सह देखील येतील.

>> या फोटोनुसार, मारुती ब्रेझा रेड कलरला ड्युअल टोन फिनिशसह री-डिझाइन केलेले 16-इंच अलॉयज मिळतील. ही चाके फक्त टॉप मॉडेल्समध्येच मिळतील. सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत हे नवीन मॉडेल मागच्या बाजूने आणखी स्लिकर आणि आणखी चांगली दिसते. Maruti Vitara Brezza

>> नवीन मारुती सुझुकी ब्रेझा 2022 देखील त्याच ग्लोबल सी प्लॅटफॉर्मवर आधारित असेल ज्यावर आउटगोइंग ब्रेझा आणि आउटगोइंग अर्बन क्रूझर तयार केले गेले आहेत. याला 5 स्टार सिक्योरिटी रेटिंग मिळण्याची अपेक्षा आहे.

Maruti To Not Produce Vitara Brezza At Toyota Bidadi Plant | Mint

>> मारुती सुझुकी न्यू ब्रेझाला नव्याने लॉन्च झालेल्या एर्टिगासारखेच इंजिन आणि ट्रान्समिशन मिळू शकते. हे प्रोग्रेसिव्ह स्मार्ट हायब्रिड तंत्रज्ञानासह नॅच्युरली एस्पिरेटेड ड्युअल VVT आणि ड्युअल जेट 1.5L पेट्रोल इंजिनद्वारे समर्थित आहे. हे इंजिन 101.65 Bhp आणि 136.8 Nm जनरेट करते. Maruti Vitara Brezza

>> हे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशी जोडले जाऊ शकते. हे 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक जुन्या आणि अवजड 4-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर युनिटची जागा घेईल. हे नवीन मॉडेल सीएनजी व्हेरियंटसह देखील येईल. Maruti Vitara Brezza

 

अधिक माहितीसाठी ‘Maruti Suzuki’ च्या वेबसाईटला भेट द्या : https://www.marutisuzuki.com/ 

हे पण वाचा :

New Hero Splendor+ Launch : देशात सर्वाधिक विकली जाणारी ‘ही’ मोटरसायकल नव्या रूपात लॉन्च

Fact Check : भारत सरकार देतंय 20 लाख रुपये? Viral मेसेज मागील सत्य जाणून घ्या

Stock Market Update : येत्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ होणार की घसरण ???

Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार

Dental Health Insurance: दातांच्या उपचारांसाठी PNB MetLife ने लाँच केला डेंटल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन

Leave a Comment