हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रीडा क्षेत्रातील दिग्गज महिला खेळाडू आणि भारताची पहिली-वहिली बॉक्सिंग ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कोम हिला 5 व्या वार्षिक यूके-इंडिया अवॉर्ड्समध्ये ‘ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. इंडिया ग्लोबल फोरम (IGF) द्वारे, UK-इंडिया अवॉर्ड्स यूके- भारत भागीदारी चालविणाऱ्या प्रमुख व्यक्ती आणि व्यवसायांच्या योगदानाचा सन्मान केला जातो .
यावेळी स्टँडिंग ओव्हेशनमध्ये पुरस्कार स्वीकारताना मेरी कोम यांनी या पुरस्काराबद्दल आभार मानले. हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. मी 20 वर्षांपासून फायटिंग करत आहे. मी माझ्या आयुष्यात बॉक्सिंगमध्ये, माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी बलिदान देण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. या ओळखीसाठी मी मनापासून तुमचे आभार मानते अशी प्रतिक्रिया मेरी कोम यांनी दिली.
यूके-इंडिया अवॉर्ड्स 2023 मध्ये कोणाला कोणता पुरस्कार मिळाला?
वर्षातील मार्केट एंट्रंट – CrowdInvest
कन्सल्टन्सी ऑफ द इयर- SannamS4
वर्षातील कायदेशीर सराव – सिरिल अमरचंद मंगलदास
वर्षातील आर्थिक सेवा संस्था – ICICI बँक UK Plc
टेक्नॉलॉजी कंपनी ऑफ द इयर – एमफेसिस
बिझनेस प्रमोशन ऑर्गनायझेशन ऑफ द इयर – फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI – UK)
सोशल इम्पॅक्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर- अॅक्शन एड यूके
यूके-भारत संबंधांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान – नेहरू सेंटर
यूके-भारत संबंधांमध्ये आजीवन योगदान – शेखर कपूर
ग्लोबल इंडियन आयकॉन ऑफ द इयर – मेरी कॉम