व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शरद पवारांचा मोठा निर्णय; ‘या’ 2 बड्या नेत्यांची हकालपट्टी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. अजित पवार यांच्या बंडखोरी नंतर हे दोन्ही राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य त्यांच्या सोबत आहेत. याच पार्श्वभूमीवर पवारांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल याना राष्ट्रवादी काँग्रेसमधून बडतर्फ केलं आहे.

शरद पवार यांनी कालच स्पष्ट केलं होत की, मीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रीय कार्यकारणीत नियुक्ती केली होती. मात्र त्यांनी पक्षविरोधी कारवाई केली. त्यामुळे पक्षाच्या धोरणाच्या विरोधात जो जाईल त्याच्यावर कारवाई केली जाईल. अखेर आजच शरद पवारांनी याबाबत ट्विट करत प्रफुल्ल पटेल आणि सुनोल तटकरे यांच्या बडतर्फीची घोषणा केली आहे.

दरम्यान, दुसरीकडे अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या पाऊलावर पाऊल टाकत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. अजितदादांकडून सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर अनिल पाटील यांची मुख्य प्रतोदपदी निवड करण्यात आली आहे. याशिवाय रुपाली चाकणकर यांची महिला प्रदेशाध्यक्ष , आणि अमोल मिटकरी यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. एकूणच शिवसेनेसारखीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्तेसाठी लढाई सुरु झाली आहे.