कोरोना लसीकरणावरुन सचिन तेंडुलकरचे हटके ट्विट, म्हणाला की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आजपासून देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या. दरम्यान, लसीकरणाच्या मुद्दयावरुन टीम इंडियाचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने एक हटके ट्विट केलं आहे.

काय म्हणाला सचिन –

कोरोना विरूद्धची लढाई म्हणजे ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीसारखी आहे. दोघांच्या आयुष्यात खूप चढउतार आले, पण आपले फलंदाज फ्रंटलाइन करोनायोद्ध्यांसारखे खेळपट्टीवर टिकून उभे राहिले. आपण करोना योद्ध्यांचं आणि भारतीय फलंदाजांचं अभिनंदन करूया.

या ट्विटमध्ये सचिनने देशवासियांना आवाहनही केलं आहे. सचिन म्हणाला की, “कोरोनाविरोधातील लढाई आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका संपलेली नाही. यामुळे सावध राहा, गाफील राहू नका.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment