धक्कादायक! कराडकर मठातील मठाधिपतीने वृद्ध विश्वस्तांच्या डोक्यात घातला वीणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड शहरातील मठाधिपतींनी नव्वद वर्षीय वृद्ध विश्वस्तांच्या डोक्यात किर्तनातील वीणा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. कराडच्या प्राचिन कराडकर मठातचे वादग्रस्त तरुण मठाधिपती बाजीराव जगताप यांनी मठाचे नव्वद वर्षीय वृध्द विश्वस्त यशवंत माने गुरुजी यांचे डोक्यात किर्तनातील वीण्याचा जीवघेणी घाव घातल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, तरुण मठाधिपती जगताप आणि वृद्ध विश्वस्त माने यांच्यामध्ये दिंडीच्या नियोजनातुन वाद निर्माण झाला होता. या वादातूनच जगताप यांनी माने यांच्या डोक्यात किर्तनातील वीणा घातली. यामध्ये नव्वद वर्षीय माने गंभीर जखमी झाले. जगताप यांनी वीणेचा घाव घातल्याने गंभीर जखमी झालेल्या माने यांना तात्काळ रुग्नालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजत आहे.

विश्वस्त यशवंत माने गुरुजी यांच्यावर कराड येथील रुग्नालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. याबाबत कराड शहर पोलिसात मठाधिपती जगताप यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Leave a Comment