व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र दिनानिमित्त आज हा मावा केक बनवून पहाच !

Hello Recipe | आज महाराष्ट्र दिन आहे. आजच्या दिवशी काही विशेष करायचा विचार करत असाल तर तुम्ही मावा केक बनवण्याचा नक्की विचार करू शकता. जाणून घ्या मावा केकची संपूर्ण रेसिपी

साहित्य –
मैदा – सव्वा वाटी
मावा – अर्धा वाटी ( किसलेला )
पीठीसाखर – अर्धा वाटी
मिल्कमेड – पाव वाटी
दूध – १ कप किंवा गरजेनुसार
तुप किंवा लोणी – २ चमचे
बेकिंग पाउडर – १ टीस्पून
बेकिंग सोडा – पाव टीस्पून
वेलची पूड – पाव टीस्पून
काजू, बदाम व पिस्ता चे काप आवडीनुसार
केकचे भांडे – ६ इंच

कृती
१) कुकरची शिटी व रिंग काढून घ्यावी,कुकरमधे १ ते दीड वाटी मीठ पसरावे व कुकर गॅसवर गरम होण्यासाठी ठेवावा. ( कमी गॅसवर )
२) केकच्या भांडयाला आतून तुप किंवा तेल चोळून बाजूला ठेवावे.
३) मैदा, बेकिंग पाउडर व बेकिंग सोडा एकत्र करून चाळून घ्यावे व बाजूला ठेवावे.
४) एका भांडयात तुप किंवा लोणी घेवून चमचाने फेटावे नंतर त्यात पीठीसाखर घालून चांगले मऊ होईपर्यंत फेटावे.
५) नंतर यात मिल्कमेड टाकून चांगले मिक्स करावे.
६) नंतर मावा, वेलचीपुड व काजू बदामचे
काप घालून चांगले मिक्स करावे.
७) शेवटी चाळलेला मैदा व दुध घालून मिक्स करावे. मिश्रण जास्त फेटु नये फक्त मिक्स करावे व लगेच तेल लावलेल्या भांडयात मिश्रण ओतावे, मिश्रण सारखे पसरावे व केक कुकरमधे बेक करण्यासाठी ठेवावा.

३० ते ४० मिनिटात तुमचा मावा केक तय्यार

टिप्स
१) साहित्य दिलेल्या प्रमाणातच घ्यावे.
२) बेकिंग पाउडर व बेकिंग सोडा यांच्या एक्सपायरी डेट्स बघुन खरेदी करावी.
३) केक मंद आचेवर बेक करावा.
४) मैदा घातल्यानंतर मिश्रण जास्त फेटु नये.
५) मिश्रण साधारण भजाच्या पीठाप्रमाने असावे जास्त पातळ किंवा घट्ट नसावे त्याप्रमाणे दूध कमी जास्त वापरावे.
६)मावा नाही वापरला तर साधा केक होईल पण दुध थोडे जास्त घ्यावे लागेल.

हि रेसिपी चाखून झाल्यावर प्रतिक्रिया कळवायला विसरु नका बरं का, अशाच हटके पाककृती जाणून घेण्यासाठी तुमच्या हक्काच्या www. hellomaharashtra.com या ठिकाणाला भेट द्या.