हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मंदिर उभारल्यानं तीन वर्षांपूर्वी चर्चेत आलेले भाजपचे कार्यकर्ते मयूर मुंढे यांनी आता भाजपलाच रामराम ठोकला आहे. नरेंद्र मोदींबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी मयूर मुंढेंनी हे मंदिर बांधेल होते, मात्र आता त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षात माजी पदाधिकाऱ्यांचे अपमान होत असून, त्यांना बैठकांमध्ये बोलावले जात नाही. कार्यकर्त्यांची मतं विचारली जात नाहीत असा आरोप करत मयूर मुंढे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र सुद्धा लिहले आहे.
मुंढेनी दिली पक्ष सोडण्याची कारणे –
मयूर मुंढेनी यांनी पत्रात नमुद केले आहे कि, पक्षात माजी पदाधिकाऱ्यांचे अपमान होत असून, त्यांना बैठकांमध्ये बोलावले जात नाही. कार्यकर्त्यांची मतं विचारली जात नाहीत, ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढण्या ऐवजी कमी होत आहे. निवडणुकीच्या वेळी प्रचारातून प्रामाणिक कार्यकर्त्यांना वगळण्यात आले आहे. आर्थिक निधीच्या वितरणामध्ये दुसऱ्या पक्षांतील लोकांना निधी दिला जातोय . याचाच परिमाण म्हणजे पक्षामध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण होत आहे. यांनी नेत्यांना याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे, ज्यामुळे कार्यकर्त्यांना योग्य सन्मान मिळेल . मुंढेनी पक्षाच्या वाढीवरील दुर्लक्षाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणतात कि , कार्यकर्त्यांच्या निष्ठेला आणि मेहनतीला मूल्य न देता, बाहेरून आलेल्यांना प्राधान्य दिले जात आहे. हे पक्षाच्या भविष्याच्या विकासासाठी धोकादायक असून शकते .
आगामी निवडणुकीवरील परिमाण –
मुंढे यांच्या या निर्णयामुळे भाजपमध्ये एक नवीन चर्चेची लाट येऊ शकते. प्रामुख्याने त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आणि पक्षाबद्दल प्रेम कमी होऊ शकते. त्याचसोबत पक्षातील एकतेवर याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. या त्यांच्या निर्णयामुळे आगामी निवडणुकांच्या रणनीतीवर आणि पक्षाच्या तयारीवर महत्त्वाचे परिणाम होऊ शकतात. अनेक नेते पक्ष सोडण्याचा विचार करतील .