बुलंदशहर : वृत्तसंस्था – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. पण तरीदेखील महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाही आहे. वाढतच जात आहेत. यामध्ये उच्च पदस्थ आणि उच्च शिक्षित लोकांकडूनही महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना घडत असतात. अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीने गुजरात केडरच्या आयएएस अधिकाऱ्यावर लग्नाच्या बहाण्याने लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या पीडित तरुणीने आरोग्य विभागात संचालकपदावर असलेल्या संबंधित अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.
पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार आयएएस अधिकाऱ्याने तिला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली होती, जी तिने स्वीकारली. यानंतर या दोघांमध्ये मैत्री झाली. हा आयएएस अधिकारी तिच्याशी फेसबुक मेसेंजरवरून चॅटिंग करत असायचा. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले. हा सर्व प्रकार उत्तर प्रदेशमधील अलीगड जिल्ह्यात घडला आहे. यानंतर या आयएएस अधिकाऱ्याने तरुणीला दिल्ली येथे नेऊन तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि तिचे अश्लील फोटो देखील काढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यानंतर पीडितेने फोटो काढण्यास विरोध दर्शविला असता या आएएस अधिकाऱ्याने तिच्याशी लग्नाची बतावणी केली. मात्र ह्या अधिकाऱ्याचे यगोदरच लग्न झाले होते. आपले अगोदर लग्न झाले आहे हि गोष्ट त्या अधिकाऱ्याने पीडित तरुणीपासून लपवून ठेवली होती. या आयएएस अधिकाऱ्याने पीडित तरुणीशी लग्न केले यानंतर त्यांना एक मुलगीदेखील झाली. यानंतर मात्र हा अधिकारी मुलगी आणि पीडित तरुणीला सोडून पळून गेला. यानंतर पीडित तरुणी आता आपल्या मुलीला न्याय मिळावा म्हणून अनेकांना विनवण्या करत फिरत आहे. त्या आएएस अधिकाऱ्यामुळेच आपल्याला मुलगी झाली असून याचा पुरावा मिळावा म्हणून ती डीएनए चाचणीची मागणी करत आहे. या तरुणीने आपल्याला न्याय मिळावा म्हणून थेट राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. तसेच मला जर न्याय मिळाला नाहीतर इच्छामृत्यूची मागणी व्यक्त केली आहे.