हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Railway हा देशातील लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रेल्वेकडूनही आपल्या प्रवाशांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा सुरु केल्या आहेत. मात्र रेल्वेतून प्रवास करत असताना अशा अनेक गोष्टी आपल्याला पहायला मिळतात, ज्याची आपल्याला माहिती नसते. भारतात छोटी-मोठी धरून अनेक रेल्वे स्थानके आहेत. मात्र रेल्वेने प्रवास करताना रेल्वे स्थानकांच्या नावांमागे जंक्शन, सेंट्रल आणि टर्मिनस असे का लिहिलेले असते, असा प्रश्न कधी आपल्या मनात डोकावला आहे का ???
हे लक्षात घ्या की, Railway स्थानके ही त्यांच्या कामाच्या आणि वैशिष्ट्याच्या आधारावर टर्मिनल किंवा टर्मिनस, जंक्शन आणि सेंट्रल अशा श्रेणींमध्ये विभागले जातात. यांद्वारे त्या स्थानकाची माहिती कळते. स्टेशनच्या नावामागे हे शब्द का वापरले जातात त्याबाबतची माहिती आपण आज जाणून घेउयात…
टर्मिनल किंवा टर्मिनस म्हणजे काय ???
Railway तून प्रवास करताना आपण अनेकदा स्थानकांच्या नावामागे टर्मिनस किंवा टर्मिनल असे लिहिलेले पहिले असेल. टर्मिनल म्हणजे हे त्या मार्गावरचे शेवटचे स्टेशन असेल. यानंतर ट्रेन परत त्याच मार्गावर येते. अनेकदा या रेल्वे स्थानकांच्या नावापुढे कॅंट असेही लिहिले जाते. म्हणजे त्या शहरात लष्कराची छावणी आहे. जसे अंबाला कॅंट, आग्रा कॅंट, अलाहाबाद कॅंट आणि अजमेर कॅंट इ.
जंक्शन आणि सेंट्रल म्हणजे काय ???
ज्या स्थानकावर Railway येण्यासाठी 1 पेक्षा जास्त मार्ग उपलब्ध आहेत, त्याला जंक्शन असे म्हणतात. म्हणजेच या स्थानकावर दोन मार्गांनी गाडी जाऊ शकते. सेंट्रलचा अर्थ त्या शहरात एकापेक्षा जास्त रेल्वे स्थानके आहेत. ते मध्यवर्ती स्थानक हे शहरातील सर्वात जुने रेल्वे स्थानक आहे. हे शहरातील सर्वात व्यस्त रेल्वे स्थानकांपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.irctc.co.in/
हे पण वाचा :
कोरोना नंतर आता देशात H3N2 विषाणूचा धोका, कर्नाटक-हरियाणामध्ये दोघांचा मृत्यू
तब्ब्ल 18 वर्षानंतर शेअर बाजारात दाखल होणार TATA Group च्या कंपनीचा IPO
Post Office च्या स्कीममध्ये मिळतोय बँकांमध्ये जास्त रिटर्न, अशा प्रकारे करा गुंतवणूक
PNB खातेधारकांसाठी महत्वाची बातमी! बँकेकडून चेक पेमेंटच्या नियमांत बदल
Gold Price Today : सोन्या-चांदीची चमक पुन्हा वाढली, तपासा आजची किंमत