महागाईचा वणवा!! आता औषधेही महागणार; 1 एप्रिल पासून किमती वाढणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पेट्रोल- डीझेल, गॅस सिलेंडर अन् खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाल्याने आधीच सर्वसामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. त्यातच आता भरीस भर म्हणजे आता औषधांच्या किमती (Medicine Price) देखील वाढणार आहेत. त्यामुळे येत्या काही काळात सर्वसामान्य जनतेचे जगणं मुश्किल होणार आहे

सरकारने शेड्यूल्ड औषधांसाठी 10 टक्क्यांहून अधिक दरवाढ करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता औषधांच्या किमतीत देखील वाढ होणार आहे. पेन किलर, अँटीबायोटिक्स अँटी-व्हायरससह अनेक अत्यावश्यक औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून वाढणार आहेत. याचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. कारण औषधं महागणार असल्यामुळे त्याचा थेट परिणाम घराच्या बजेटवर होणार

कोरोनाच्या साथीनंतर फार्मा इंडस्ट्री (Pharma Industry) सातत्याने औषधांच्या किमती वाढवण्याची मागणी करत होती. या पार्श्वभूमीवर शेड्यूल औषधांच्या किमतीत 10.7 टक्के वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. शेड्यूल ड्रगमध्ये अत्यावश्यक औषधांचा समावेश होतो आणि त्यांच्या किमती नियंत्रित केल्या जातात. या औषधांच्या किमती मंजुरीशिवाय वाढवता येत नाहीत.

 

Leave a Comment