तुमचे पॅन कार्ड नकली आहे कि खरे ?? अशा प्रकारे ओळखा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पॅन कार्ड हे सरकारी डॉक्युमेंट आहे. बँकिंग किंवा इतर वित्तसंबंधित कामांमध्ये त्याची गरज असते. बँक खाते उघडणे, मालमत्ता खरेदी करणे किंवा विकणे, वाहन खरेदी करणे किंवा विक्री करणे, ITR दाखल करणे, 2 लाख रुपयांपेक्षा जास्त दागिने खरेदी करणे यासह अशी अनेक कामे आहेत ज्यामध्ये पॅन कार्ड आवश्यक असते.

बनावट ओळखपत्रांची प्रकरणे रोजच समोर येत असतात, मात्र आता बनावट पॅनकार्डच्या बातम्याही ऐकायला मिळत आहेत. अशा परिस्थितीत, तुमचे पॅन कार्ड खरे आहे की बनावट हे शोधण्यासाठी, तुम्ही खाली दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता-

तुमचे पॅन कार्ड कसे ओळखायचे ते जाणून घ्या

>> इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या http://www.incometax.gov.in/iec/foportal ई-फायलिंग पोर्टलला भेट द्या.

>> तुम्हाला डावीकडील Verify your PAN च्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

>> तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.

>> येथे तुम्हाला पॅन कार्डची संपूर्ण माहिती भरावी लागेल.

>> येथे पॅन क्रमांक, पूर्ण नाव, जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक टाका.

>> माहिती भरल्यानंतर पोर्टलवर माहिती पॅनकार्डशी जुळते की नाही असा मेसेज येईल.

तुमचे पॅन कार्ड खरे की खोटे हे अशा प्रकारे शोधा

आधार-पॅन ऑनलाइन कसे लिंक करावे ?
तुम्हाला http://www.incometaxindiaefiling.gov.in या साइटला भेट द्यावी लागेल. येथे तुम्हाला Link Aadhaar चा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. एक नवीन विंडो उघडेल. या विंडोमध्ये तुमचा आधार क्रमांक, पॅन क्रमांक, नाव, कॅप्चा कोड एंटर करा. त्यानंतर Link Aadhar वर क्लिक करा. क्लिक करताच तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले जाईल.

आधार-पॅन SMS द्वारे देखील लिंक केले जाऊ शकते
मोबाईलवरून, तुम्हाला पॅन सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी NSDL किंवा UTITL ला SMS पाठवावा लागेल. आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी 567678 किंवा 56161 वर SMS पाठवावा लागेल. या फॉरमॅट मध्ये SMS पाठवावा लागेल-

>> SMS मध्ये UIDPAN लिहावे लागेल.

>> यानंतर स्पेस सोडा आणि 12 अंकी आधार क्रमांक लिहा.

>> यानंतर, पुन्हा जागा सोडा आणि 10 अंकी पॅन क्रमांक लिहा.

>> NSDL साठी 567678 वर मेसेज पाठवा.

>> UTITL साठी 56161 वर मेसेज पाठवा.

Leave a Comment