सर्वात लहान स्टार्टअप उद्योजक ज्यांनी Hurun India Rich List 2021 मध्ये स्थान मिळवले ‘त्या’ शाशवत नाकरानी विषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जर कठोर परिश्रम केले गेले तर तुम्हाला आभाळा एवढी उंची गाठण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. प्रत्येकाने हे अनेकदा ऐकले असेल आणि अशी अनेक लोकंही आहेत ज्यांनी ते खरे केले आहे. मात्र जर कोणी वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी असा पराक्रम केला तर त्यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड होईल. शाश्वत नाकरानी ही अशीच एक व्यक्ती आहे ज्याने हे सिद्ध केले की योग्य मेहनत नेहमी चांगले फळ देते.

IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 जाहीर करण्यात आली आहे. 46 स्टार्टअप संस्थापकांनी या लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे, त्यापैकीच एक नाव आहे शाश्वत नाकरानी, जे या लिस्ट मधील सर्वात तरुण स्टार्टअप व्यावसायिक आहेत. चला तर मग त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात …

4 वर्षांपूर्वी बनवले BharatPe App
शाश्वत नाकरानीने वयाच्या 19 व्या वर्षी अश्नीर ग्रोव्हरच्या मदतीने 4 वर्षांपूर्वी 2018 मध्ये BharatPe QR Code तयार केला होता. आज BharatPe इतका यशस्वी झाला आहे की शाश्वतचे नाव IIFL वेल्थ हुरुन इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये सर्वात तरुण सेल्फ मेड इंडीविजुअल म्हणून आले आहे. हुरून इंडिया रिच लिस्ट 2021 मध्ये 1990 नंतर जन्मलेल्या 13 लोकांमध्ये नाकरानीचा समावेश आहे.

BharatPe शी संबंधित 70 लाखांहून अधिक व्यापारी
BharatPe हा एकमेव असा QR Code आहे जो 150 UPI पायमेन्ट Apps द्वारे स्वीकारला जातो ज्यामध्ये सर्व पेमेंट प्लॅटफॉर्म Paytm, GooglePay,PhonePay,AmazonPay चा समावेश आहे. सध्या 70 लाखांहून अधिक व्यापारी BharatPe शी संबंधित आहेत. UPI ट्रान्सझॅक्शनची एकूण संख्या 11 कोटी आहे.

अशा प्रकारे आयडिया आली
नाकरानीने बाजारातील एक प्रचंड मोठी गॅप ओळखली आणि पेमेंट गेटवेची गरज जाणवली ज्याला सर्व व्यापाऱ्यांद्वारे एक्सेस करता येईल आणि जे त्यांचे मार्जिन कट करणार नाही. यानंतर, त्याने UPI च्या इंटरऑपरेबिलिटी फीचरचा फायदा घेऊन व्यापाऱ्यांना मदत करू शकणाऱ्या सोल्युशनवर काम करण्यास सुरुवात केली. नाकरानीच्या या उपायाने, व्यापाऱ्याने वेगवेगळ्या पेमेंट Apps साठी वेगवेगळे QR Code लागू करण्याच्या त्रासापासून मुक्तता केली.

IIT दिल्ली येथून शिक्षण घेतले
शाश्वतने IIT दिल्लीतून शिक्षण घेतले आहे. शाश्वत 2015 मध्ये IIT दिल्लीत रुजू झाला. त्याने टेक्सटाईल टेक्नॉलॉजीमध्ये पदवी घेतली आहे.