Mega Block On Sunday| मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. या रविवारी उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्तीसाठी आणि सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रेल्वेच्या 3 मार्गांवर मेगाब्लॉक राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागेल. हे मेगाब्लॉक माटुंगा-मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर, कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर आणि सांताक्रूझ ते गोरेगाव अप-डाउन धीम्या मार्गावर घेण्यात आले आहे. ज्यामुळे उद्या प्रवाशांची गैरसोय होऊ शकते.
मध्य रेल्वे मेगाब्लॉक (Mega Block On Sunday)
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा – मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 3.10 पर्यंत मेगाब्लॉक आहे. ज्यामुळे CSMT येथून निघालेल्या ट्रेन माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. पुढे या लोकल ट्रेन जलद गाड्या डाउन जलद मार्गावर वळतील. त्यानंतर ठाण्यातून निघालेल्या ट्रेन अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या ट्रेन मार्गावरील थांब्यांवर थांबतील. तिथून पुढे ट्रेनस् अप जलद मार्गावर पुन्हा वलविल्या जातील.
हार्बर रेल्वे मेगाब्लॉक
उद्या हार्बर रेल्वेच्या कुर्ला-वाशी अप आणि डाउन मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यामुळे वाशी, बेलापूर, पनवेलमधून निघालेल्या CSMT मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि CSMT मधून वाशी/ पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. यादरम्यान CSMT ते कुर्ला, पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल सेवा धावेल. उद्या सकाळी 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत प्रवाशांना ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करता येईल.
पश्चिम रेल्वे मेगाब्लॉक (Mega Block On Sunday)
रविवारी पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावरून धावतील. विलेपार्ले आणि राम मंदिर स्थानकावर लोकल थांबणार नाही. यात काही लोकल बोरिवली-अंधेरी लोकल हार्बर मार्गावरील गोरेगाव स्थानकांपर्यंत सुरू असतील.