हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| 12 पास असणाऱ्या आणि सरकारी नोकरी करून घेणाऱ्या तरुणांसाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडने मेगा भरतीची घोषणा केली आहे. या भरतीअंतर्गत जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीच्या एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी इंडियन ऑइल कडून अर्ज मागवले जात आहे. इच्छुक तरुण भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2024 आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीच्या एकूण 30 रिक्त पदे भरली जाणार आहेत. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी किमान 40 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण असावी. तसेच, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान 17 वर्षे आणि कमाल 35 वर्षे असायला हवे. या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी https://iocl.com/admin/img/UploadedFiles/LatestJobOpening/Files/f1c6e1081e8241e3ab4af7b8cac120c1.pdf या वेबसाईटला भेट द्यावी.
त्याचबरोबर ज्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांनी iocl.com या वेबसाईटला भेट द्यावी. लक्षात ठेवा की अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 ऑगस्ट आहे. या भरती अंतर्गत सर्व राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत विशेष सवलत दिली जाईल. या पदासाठी उमेदवार निवडण्याकरता परीक्षेचे आयोजन केले जाईल. या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारावर रिक्त पदांसाठी उमेदवाराची निवड केली जाईल. त्यासाठी इच्छुक उमेदवारांना 15 ऑगस्टच्या आत अर्ज करण्याची आवश्यकता आहे.
अर्ज कसा भरावा??
- सर्वात प्रथम cai.org वर जावे.
- त्यानंतर पेजवर दिसत असलेल्या ICAI भरती 2024 – – – – लिंकवर क्लिक करावे.
- त्यासाठी सर्व आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे जोडा.
- यानंतर अर्ज शुल्क ऑनलाइन भरा.
- पुढे अर्जाची प्रिन्ट काढून तुमच्याकडे ठेवा.