नोकरीची सुवर्णसंधी!! भारतीय पोस्ट विभागात 1 लाखांहून अधिक जागांसाठी मेगाभरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय टपाल विभागात १ लाखांहून अधिक जागांसाठी मेगाभरती पार पडणार आहे. त्यासाठीची अधिसूचना केंद्र सरकार कडून जारी करण्यात आली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

कोणत्या पदांसाठी किती जागा-

पोस्टमन- 59,099
मेलगार्ड- 1445
मल्टी- टास्किंग पोस्ट- 37,539

महाराष्ट्रात किती जागा-

पोस्टमन-9884
मेलगार्ड- 147
मल्टी- टास्किंग पोस्ट- 5478

वयोमर्यादा-

कमीत कमी- १८ वर्ष
जास्तीत जास्त- ३२ वर्ष

शैक्षणिक पात्रता-

1. उमेदवार दहावी उत्तीर्ण असले पाहिजेत आणि त्यांना संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
2. काही पदांसाठी उमेदवारांनी इंटर किंवा इयत्ता 12 वी पूर्ण केलेली असावी.
3. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलंल आहे.
4. उमेदवारांना पदाचा किमानसंबंधित अनुभव असणं आवश्यक आहे.
5. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

असा करा अर्ज-

1. सर्वप्रथम इंडिया पोस्ट indiapost.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा

2. मुख्यपृष्ठावरील भर्ती लिंकवर क्लिक करा

3. तुम्हाला अर्ज करायचे असलेले पोस्ट निवडा, पात्रता निकष तपासा

4. स्वतःची नोंदणी करा

5. फॉर्म भरा (India Post recruitment 2022 )

6. फी भरा आणि सबमिट करा

7. पुढील वापरासाठी पोचपावती फॉर्म डाउनलोड करा, सेव्ह करा आणि प्रिंट आउट घ्या.