तेलगू अभिनेत्री पावला श्यामलांवर आली उपासमारीची वेळ; मेगास्टार चिरंजीवीने केली मदत

Shyamla_Chiranjeevi
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. यामुळे अनेक राज्यांतील चित्रीकरण बंद आहेत. यामुळे अनेक कलाकार बेरोजगार झाले असून घरीच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन असल्यामुळे मनोरंजन अनेक छोट्या- मोठ्या कलाकारांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास १०० चित्रपटांमध्ये अव्वल भूमिका साकारलेल्या तेलुगू अभिनेत्री पावला श्यामला यांची अशीच काहीशी बिकट परिस्थिती आहे. त्यांना सध्या आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे. याकरिता साऊथ स्टार चिरंजीवींनी त्यांच्या परीने शक्य तितकी मदत पावला याना दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावला श्यामला यांची तब्येत बरी नसून औषधांचा खर्च त्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. श्यामला यांना एक मुलगी असून तिलाही टीबी आजाराचे निदान झाले आहे. त्यामुळे घरात आता कमावते असे कोणीच नसल्याने त्यांच्यावर हि बिकट परिस्थिती उपासमारीची वेळ आली आहे. श्यामला ७० वर्षीय असून त्यांना दरमहा १० हजार रुपये पेन्शन मिळणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र ते मिळत नसल्याचा त्यांनी खुलासा केला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले ‘तेलंगणा सरकारकडून वृद्धांसाठी मिळणारं पेन्शन मला गेल्या काही महिन्यांपासून मिळत नाहीये. माझ्यासाठी आणि मुलीसाठी दोन वेळचे जेवणसुद्धा मिळवणे कठीण झाले आहे,’ अशा शब्दांत त्यांनी आपल्या बिकट परिस्थितीबाबत व्यथा मांडली.

या मुलाखतीदरम्यान पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि,’माझ्या औषधांचा खर्च दर महिन्याला दहा हजार पर्यंतचा आहे. कोरोनामुळे सध्या मदतीसाठी कोणी पुढे सरसावत नाही आहे. आम्ही अन्नधान्यसुद्धा खरेदी करू शकत नाही आहोत’. श्यामला यांच्या या मुलाखतीनंतर काही कलाकारांनी त्यांना मदत करण्याची इच्छा स्वतःहून व्यक्त केली आहे. नुकतेच साऊथ मेगा सुपरस्टार के. चिरंजीवी यांनी श्यामला यांना आर्थिक मदत केली आहे. के चिरंजीवी यांनी स्वतःकडून श्यामला यांना १,०१,५००/- रुपये इतके आर्थिक सहाय्य केले आहे.