औरंगाबाद | मेल्ट्रॉनमध्ये सर्वच बेडला ऑक्सिजन उपलब्ध व्हावा या साठी वर्षभरापासून प्रयत्न सुरु होते. पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य टाकरे यांनी मेल्ट्रॉन कोविड सेंटरसाठी उपलब्ध करून दिलेल्या ऑक्सीजन प्रकल्पाचे काम पूर्ण झाले आहे. याची चाचणी घेतली जाणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.
ऑक्सिजन उपलब्ध व्हावा यासाठी वर्षभरापासून प्रयत्न होते. मंजूर लिक्विड ऑक्सिजन प्लांट शासनाच्या आदेशाने रद्द करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक व आदित्य ठाकरे यांच्या माध्यस्थीने एक असे दोन हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर साठी मंजूर करण्यात आले.
आदित्य टाकरे यांनी दिलेल्या प्लांटचे काम आता पूर्ण झाले आहे. या प्लांटमधून एक मिनिटाला 250 लिटर म्हणजेच दिवसाला 40 जम्बो ऑक्सिजन सिलिंडर मिळणार आहे. मेल्ट्रॉनमधील दीडशे वेबसाठी लाईन टाकली जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मंजूर केलेल्या प्लांटचे काम एअरओक्स टेकनॉलॉजी या कंपनी मार्फत केले जाणार आहे. या प्लांट मधून एका दिवसात 175 जम्बो ऑक्सिजन मिळणार आहे. या प्लांटच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. दोन कोटी 79 लाख रुपये खर्चून हा प्लांट सुरु केला जाणार आहे.