Monday, February 6, 2023

वारकऱ्यांचे आंदोलन असुरी पद्धतीने गुंडाळले, त्याची शासनाला किंमत मोजावी लागेल : बंडातात्या कराडकर

- Advertisement -

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

पोलिसांनी घेतलेला निर्णय हा त्यांचे वरिष्ठांचे आदेश देतात त्याप्रमाणे त्यांनी कारवाई केली आहे. वारकऱ्यांच्या बाबत शासनाने घेतलेली भूमिका स्विकारार्ह नसून निषेधार्ह आहे. वारकर्‍यांची आंदोलन गुंडाळण्याची ही जी असुरी पद्धत आहे, त्याची किंमत शासनाला मोजावी लागेल, असा इशारा जेष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.

- Advertisement -

बंडातात्या कराडकर म्हणाले, माझी भूमिका कोणी समजून घेतली नाही. आमच्या भूमिकेबद्दल उलट सुलट प्रतिक्रिया चालू आहेत. कोरोना सारख्या महाभयंकर संकट आहे, तरीही आग्रह का धरला आहे, प्रश्न उपस्थित केला जात आहे. 29 मार्च पासून आम्ही शासनाचा पाठपुरावा करत गेले तीन महिने झाले. किमान पन्नास लोकांना पायी वारीसाठी परवानगी द्यावी अशी वारंवार विनंती शासनाकडे केली. परंतु शासनाला यामध्ये कोणताही पाझर फुटला नाही. शेवटी आम्ही आव्हान दिल्याप्रमाणे काल सायंकाळी सात वाजता आमच्या नियमाप्रमाणे पायी वारी सुरू केली.

कराड येथे गो- पालन केंदात स्थानबद्ध केलेले आहे. मी महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना विनंती करतो, की कोणी उग्र निदर्शने करु नयेत, असेही आवाहन बंडातात्या कराडकर यांनी केले आहे.