हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mental Stress) वैवाहिक आयुष्य म्हणजे रोलर कोस्टर राईड. जी दोघांनी मिळून एन्जॉय करायची असते. तो घाबरला तर तिने धीर द्यायचा आणि ती घाबरली तर त्याने सांभाळून घ्यायचं. वैवाहिक आयुष्य हे बऱ्याच चढ- उत्तरांनी भरलेले असते. त्यामुळे नवरा बायकोने एकमेकांना सावरून, सांभाळून घ्यायलाच हवं. नाहीतर गाडी चालवताना एखाद चाक निखळलं तर गाडीची जी अवस्था होईल तीच आपल्या आयुष्याची होऊ शकते. बऱ्याच जोडप्यांमध्ये अगदी क्षुल्लक गोष्टींमुळे भांडण होत असत. ज्यामुळे दोघांमध्ये मानसिक ताण तणाव वाढतो आणि याचा परिणाम थेट त्यांच्या नात्यावर होत असतो.
याशिवाय बऱ्याचदा कामाचा वाढणारा ताण आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळेसुद्धा आपला पार्टनर टेन्शनमध्ये असू शकतो. बऱ्याच चिंता एकावेळी त्रास देत असल्यामुळे अनेकदा त्याची चिडचिड होते. तो नेहमीच रागावतो असे नाही पण जेव्हा रागावतो तेव्हा ऐकायच्या मनस्थितीत नसतो. (Mental Stress) बऱ्याचदा असे लोक संवाद टाळतात, एकत्र राहू लागतात, यामुळे वैवाहिक आयुष्यात अडचणी येऊ लागतात. जर तुमच्याही आयुष्यात अशी स्थिती निर्माण झाली असेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला काही टिप्स देतो. त्यांचा वापर करा आणि पुन्हा एकदा आनंदी तसेच सुखी वैवाहिक जीवन जगा.
पार्टनरची चिंता समजून घ्या (Mental Stress)
तुमचा जोडीदार निराश, हताश आणि चिंताग्रस्त दिसत असेल तर, सगळ्यात आधी त्याची समस्या काय आहे? हे समजून घ्या. त्याला नेमकी कशाची काळजी वाटते आहे हे जाणून घ्या. यामुळे तुम्हाला त्याची वा तिची समजूत काढणे सोपे जाईल. शिवाय त्याने किंवा तिने तुमच्याशी समस्येबाबत चर्चा केल्यास त्याचा ताण हलका होईल. आपल्या पार्टनरची समस्या ऐकून घेताना संयमाने घ्या आणि तो जे बोलतोय ते नीट ऐका. त्याला त्रास होतोय असे जाणवल्यास विषय थांबवा आणि विषयांतर करा.
वेळ घ्या, संयम ठेवा आणि संवाद साधा
जर तुमचा पार्टनर एखाद्या समस्येने त्रासला असेल तर त्याची समस्या समजून घ्या आणि त्यावर त्याच्याशी चर्चा करा. संवादातून बरेच प्रश्न सुटतात. कदाचित तो तुम्हाला त्याची समस्या सांगून तणावमुक्त फील करू शकतो. (Mental Stress) त्यामुळे त्याची समस्या संयमाने हाताळा. तो तुमच्यासाठी आणि तुम्ही त्याच्यासाठी खास आहात हे त्याला फील होऊ द्या. आपल्या पार्टनरला घेऊन फिरायला जा. शांत आणि निवांत वेळ घालवा आणि मग संवाद साधा. असे केल्यास त्याचा ताण नक्कीच हलका होऊ शकेल.
निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जा
जर तुमचा पार्टनर दिवसेंदिवस अबोल आणि अव्यक्त होत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर सगळ्यात आधी तुम्ही त्याच्याशी संवाद वाढवा. काही केल्या तो मिसळत नसेल तर थेट फिरायचा प्लॅन करा. (Mental Stress) एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी वा सुंदर स्पॉटला विझिट करा. नैसर्गिक सौंदर्य आणि ताज्या हवेचा त्याला दिलखुलास आनंद घेऊ द्या. कदाचित त्याच्या मेंदू आणि मनावरील ताण कमी होईल.
तज्ञांचा सल्ला
बरेच प्रयत्न करूनही जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचा पार्टनर कोषातून बाहेर येत नाहीये. तर त्वरित मानसिक तज्ञ वा थेरपिस्टची मदत घ्या. यासाठी तुम्हाला तुमच्या पार्टनरला समजवून सांगावं लागेल की, तो आजारी नाहीये. (Mental Stress) त्याला केवळ मनःशांतीची गरज आहे आणि म्हणून काऊन्सिलरचे सेशन अटेंड करायचे आहे. ज्यामध्ये तुम्हीही त्याच्यासोबत असाल. असे केल्यास तज्ञ तुम्हाला या समस्येतून बाहेर येण्याचे मार्ग सुचवतील.