हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लक्झरी कार (Mercedes-Benz EQS 580) निर्माता कंपनी मर्सिडीज इंडियाने आपली पहिली मेड इन इंडिया इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे. कंपनीने ही कार भारतातच बनवली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक कार तब्बल 857 किमी धावेल. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या गाडीचे खास फीचर्स आणि किंमत याबाबत..
210 किमी टॉप स्पीड –
Mercedes-Benz EQS 580 मध्ये 107.8kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. ही बॅटरी दोन इलेक्ट्रिक मोटर्सला पॉवर देते, जे फ्रंटआणि रिअर एक्सलवर माउंट केले जातात. हि लक्झरी कार 523hp पॉवर आणि 856Nm टॉर्क जनरेट करते. ही इलेक्ट्रिक मर्सिडीझ फक्त 4.3 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास वेग घेऊ शकते. या कारचा टॉप स्पीड 210 किमी प्रतितास आहे.
857 किमी मायलेज- (Mercedes-Benz EQS 580)
कारची सिस्टीम 200kW DC फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते, मर्सिडीजने दावा केला आहे की 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही कार तब्बल 300 किलोमीटर धावेल. तसेच एकदा चार्ज केल्यांनतर मर्सिडीजची इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 857 किमीचे मायलेज देते.
लुक आणि डिझाइन-
गाडीच्या लुक आणि डिझाइनच्या बाबतीत (Mercedes-Benz EQS 580) बोलायचं झाल्यास, मर्सिडीज-बेंझ EQS 580ला EQS 53 AMG च्या तुलनेत टोन्ड-डाउन लुक देण्यात आला आहे. तसेच EQS 53 AMG च्या तुलनेत ही कार थोडी लहान आहे. EQS 53 AMG ची लांबी 5,223 मिमी आहे, तर EQS 580 ची लांबी 5,216 मिमी आहे. गाडीच्या इंटेरिअर बाबत सांगायचं झाल्यास यामध्ये तीन मोठे हाय-डेफिनिशन डिस्प्ले आहेत. कंपनीने यामध्ये अनेक इंटीरियर कलर ऑप्शन्स दिले आहेत. त्यात बालाओ ब्राउनसह नेवा ग्रे, स्पेस ग्रेसह मॅकियाटो बेज आणि तपकिरी ओपन-पोर वॉलनट वुड सारख्या रंगांचा समावेश आहे.या इलेक्ट्रिक कार मध्ये हेड-अप डिस्प्ले, पुढच्या सीटसाठी मसाज फंक्शन, बर्मेस्टर 3D सराउंड सिस्टम, एअर फिल्टरेशन सिस्टम, 9 एअरबॅग्ज आणि बरेच काही समाविष्ट आहे.
किंमत –
या इलेक्ट्रिक कारची किंमत 1.55 कोटी रुपये आहे. मर्सिडीज-बेंझ इंडियाने कारसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे, जर तुम्हाला ही कार बुक करायची असेल तर तुम्ही 25 लाख रुपये भरून बुक करू शकता.
हे पण वाचा :
Tata Tiago EV : टाटा मोटर्सने लॉन्च केली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; पहा किंमत आणि फीचर्स
Electric Scooter : 2 स्वस्त इलेक्ट्रिक स्कुटर लॉन्च; 47 हजारांपासून सुरू होते किंमत
Maruti Suzuki Grand Vitara : मारुती सुझुकीची Grand Vitara लॉन्च; पहा किंमत आणि फीचर्स
BMW i4 : एका चार्जमध्ये 590 किमी धावणार BMW ची इलेक्ट्रिक कार; किती आहे किंमत?