Audi A4 : नव्या अपडेटसह लॉन्च झाली Audi A4; पहा किंमत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर्मन लक्झरी (Audi A4) कार निर्माता ऑडीने नव्या अपडेट सह आपली प्रीमियम ऑडी A4 भारतात लॉन्च केली आहे. या लक्झरी सेडानची एक्स-शोरूम किंमत 43.12 लाख रुपये आहे. कंपनीने प्रीमियम, प्रीमियम प्लस आणि टेक्नॉलॉजी या तीन प्रकारांमध्ये A4 लॉन्च केली आहे. आज आपल्या कार रिव्हिव्ह मध्ये जाणून घेऊया या दमदार गाडीचे खास फीचर्स….

फीचर्स-

ऑडी A4 मधील नव्या अपडेट्सबद्दल बोलायचे झाले (Audi A4)  तर ही कार आता दोन नवीन रंगांमध्ये सादर केली आहे, यामध्ये टँगो रेड आणि मॅनहॅटन ग्रे यांचा समावेश आहे. फीचर अपडेट्सबद्दल बोलायचे झाले तर, नवीन ऑडी A4 च्या टॉप टेक्नॉलॉजी ट्रिममध्ये फ्लॅट बॉटम स्टीयरिंग व्हील, 19 स्पीकर आणि B&O ऑडिओ सिस्टम आहे. ऑडी A4 च्या लूकबद्दल बोलायचे झाले तर ते अतिशय आधुनिक आणि स्पोर्टी दिसते.

Audi A4

गाडीच्या इतर फीचर (Audi A4) अपडेट्समध्ये 10.1-इंचाची इन्फोटेनमेंट टचस्क्रीन, ऑडीचा व्हर्च्युअल कॉकपिट डिस्प्ले, इलेक्ट्रिक ग्लास सनरूफ, वायरलेस चार्जिंग, लेदरेट अपहोल्स्ट्री, 30-कलर अॅम्बियंट लाइटिंग, थ्री-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल फ्रंट सीट्स, सहा एअरबॅग्ज, फ्रंट एन्ड रीअरचा समावेश आहे.

Audi A4

इंजिन- (Audi A4)

गाडीच्या इंजिनबाबत बोलायच झाल्यास, ऑडीने नवीन A4 मध्ये पूर्वीचेच 2.0- लिटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन ठेवले आहे. हे इंजिन 187 Bhp पॉवर आणि 320 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 7-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. या ऑडीचे टॉप स्पीड 204 किमी प्रतितास आहे आणि ही सेडान कार फक्त 7.3 सेकंदात ताशी 0 ते 100 स्पीड वाढवू शकतो.

Audi A4

किंमत

गाडीच्या किमतीबाबत (Audi A4)सांगायचं झालं तर या लक्झरी सेडान कारची किंमत तिच्या वेगवेगळ्या व्हेरिएन्ट नुसार आहे. यामध्ये प्रीमियम व्हेरिएन्ट – 43.12 लाख रुपये, प्रीमियम प्लस व्हेरिएन्ट 47.27 लाख आणि टेक्नॉलॉजी व्हेरिएन्टची किंमत 50.99 लाख रुपये आहे.

हे पण वाचा : 

Volvo XC40 Facelift : Volvo XC40 फेसलिफ्ट भारतात लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये

Audi Q3 2022 : भारतात लॉन्च झाली ऑडी Q3; 7.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते

Kawasaki Z900 : Kawasaki ने लॉन्च केली नवी Bike; पहा किंमत आणि फीचर्स

Mahindra XUV400 : 456 किमी रेंज अन् 150 किमी टॉप स्पीड; Mahindra XUV400 चे दमदार फीचर्स पहाच

HOP OXO Electric Bike : 150 किमी रेंज असलेली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; पहा किंमत आणि वैशिष्ट्ये