कराड नगरपालिकेचे मेहरबान, कदरदान ऑक्सिजन खरेदीसाठी असंवेदनशील; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना स्टंट करणारे गायब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

स्वच्छ सर्वेक्षणात देशभर डिंडोरा पिटणाऱ्या, कोट्यावधीची बक्षिसे मिळवणाऱ्या कराड नगरपलिकेचे मेहरबान, कदरदान (अधिकारी) ऑक्सिजन खरेदीसाठी परावलंबी असलेली दिसून येत आहे. शहरातील अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती मदत करत असताना नगरपालिका असंवेदनशील असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रस्त्यांवर, आपल्या प्रभागात काही दिवसांपूर्वी मदतीचा स्टंट करणारेही गायब झालेले आहेत.

कराड नगरपालिकेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला नंबर आला. शहरातील नागरिकांनी मेहरबान, कदरदान (अधिकारी) यांचे गोडकौतुक केले. अनेकांनी आपण काय- काय केले हे सांगितले. त्यानंतर मेहरबान- कदरदान यांनी आपण कोरोना योध्दा असल्याचे पान- पानभर छापून आणले, गावभर सोशल मिडियावर फिरवले. कराड नगरपालिकेचे कारभारी आम्ही किती संवेदनशील आहोत, यांचा दिंडोरा पिटवत आले. यावेळी काही हजार रूपयांत उपलब्ध होत असलेली ऑक्सिजन मशीन खरेदी करायला मात्र अजूनही सुचलेले नाही.

सध्या कोरोना बाधितांचा आकडा शहरात मोठ्या प्रमाणात दिवसेंन- दिवस वाढत आहे. कोव्हीड-१९ साठी उपलब्ध असलेल्या हॉस्पीटलमधील बेड बाधितांना मिळत नाहीत. अशा परिस्थितीत कोव्हीड बाधित असणाऱ्यांला ऑक्सिजन मशीन जीवनदायी ठरत असल्याने शहरातील अनेक सामाजिक व्यक्ती, संस्थाकडून मशीन पालिकेला दिल्या जात आहेत. अशावेळी पालिका या मशीन स्विकारण्याचे काम उत्तमपणे पार पाडत आहे. मात्र नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना स्वतः मशीन खरेदी करण्यात कराड नगरपालिका असंवेदनशील असल्याचे दिसून येत आहे.

पालिकेचा ॲक्शन प्लन कुठे आहेत

शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढू नये, यासाठी ॲक्शन प्लन केल्याचे वारंवारं पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी सांगत होते. प्रत्येक प्रभागात आम्ही स्वतः लक्ष ठेवून असून कोणतीही गैरसोय होणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र सध्या बाधितांची संख्या वाढत असताना पदाधिकारी ठराविक ठिकाणीच दिसत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment