व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

JDU चे RJD मध्ये विलीनीकरण?? नितीशकुमारांनी स्पष्टच सांगितलं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या JDU ने लालूप्रसाद यादव यांच्या RJD सोबत सत्तास्थापन केल्यांनतर जेडीयू आणि आरजेडी यांचे विलीनीकरण होणार अशा चर्चा सुरु होत्या. मात्र मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. जेडीयू आणि आरजेडीच्या विलीनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नाही. जेडीयू कोणत्याही पक्षापेक्षा कमकुवत नाही असं त्यांनी म्हंटल आहे.

काल रात्री उशिरा जेडीयू विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. यावेळी त्यांनी म्हंटल की, कोणताही गोंधळ करू नका. जेडीयू कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही. 2014-15 मध्ये आम्ही असा प्रयत्न केला होता, मात्र आता तसे काही नाही. असं म्हणत नितीशकुमार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आणि सर्व चर्चाना पूर्णविराम दिला.

2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी देशभरातील विरोधी पक्षांना एका व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बिगर-भाजप पक्षांनी एकाच व्यासपीठावर यावे, जेणेकरून भाजपचा पराभव करता येईल असे नितीशकुमार म्हणाले. याशिवाय आपण सर्व मजबूत राहिल्यास सर्व जागा जिंकू, असेही त्यांनी आपल्या आमदारांना सांगितले.