नोकरीचे आमिष दाखवून मेस चालक तरुणीवर केला बलात्कार; आरोपीवर गुन्हा दाखल

0
36
Crime
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | कोरोना काळात मेस व्यवसाय बंद झाल्याने जालनाच्या जिल्हा परिषद किंवा औरंगाबाद महानगरपालिकेत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका 28 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. जानेवारी महिन्यात निर्जन स्थळी नेवून कारमध्ये मारहाण करून अरुण अग्रवाल (रा .जालना ) याने अत्याचार केल्याची तक्रार महिलेने सातारा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून अग्रवालवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार खानावळ बंद झाल्याने काहीजण डबा घेऊन जात होते. अग्रवाल हा मेसचा सभासद असल्याने त्याच्याशी चांगलघ ओळख होती. लाॅकडाऊन मध्ये अग्रवालने पिडितेला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जानेवारीमध्ये तिच्या घरी जाऊन नोकरी लावणाऱ्या व्यक्तीकडे जाऊ असे सांगून कारमध्ये बसवले. रात्री आठ वाजता त्याने एमआयटी महाविद्यालयाच्या मागील बाजूस कार थांबवली.

अंधारात कार का थांबवली, असे विचारताच त्याने तिला मारहाण सुरू केली. त्यानंतर कारच्या मागील सीटवर तिच्यावर अत्याचार केला त्यानंतर मित्रांना मार्फत तिच्यावर तक्रार न देण्यासाठी दबाव आणला. पीडितेने मैत्रिणीला हा घडलेला प्रकार सांगितल्यावर तु सातारा पोलिसांकडे तक्रार कर असे सांगितले. अखेर 13 जुलै रोजी पीडितेने तक्रार दिल्यानंतर बलात्काराचा गुन्हा अरुण अग्रवाल यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here