हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ब्रिटिश वाहन निर्माता कंपनी MG Motor ने आपली इलेक्ट्रिक कार Comet भारतीय मार्केट मध्ये लाँच केली आहे. कंपनीने या गाडीची किंमत 7.98 लाख रुपये ठेवली आहे. कंपनीची ही दुसरी इलेक्ट्रिक कार असून अनेक दमदार फीचर्सने सुसज्ज आहे. 15 मे पासून या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग सुरु होणार आहे तत्पूर्वी आपण जाणून घेऊया या इलेकट्रीक कारचे खास वैशिष्टये..
फीचर्स – MG Comet
MG Comet आकाराने लहान कार आहे. गाडीची लांबी 2974 मिमी, रुंदी 1505 मिमी आणि उंची 1640 मिमी आहे. कारचा व्हीलबेस 2010 मिमी आहे आणि तिची टर्निंग रेडिएस 4.2 मीटर आहे. फीचर्स बाबत सांगायचं झाल्यास या कारला २ दरवाजे आणि ४ सीट्स आहेत. कारच्या बाहेरील भागात कनेक्टेड एलईडी डीआरएल, एलईडी हेडलाइट्स, एलईडी टेललाइट्स देण्यात आल्या आहेत. तर आतील भागात 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, ड्युअल कलर इंटीरियर, ऍपल कार प्ले असे दमदार फीचर्स मिळतात.
230 किलोमीटर रेंज –
या इलेक्ट्रिक कारमध्ये 17.3 Kwh ची मोटर देण्यात आली आहे. गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी जवळपास ७ तास लागतील. परंतु एकदा फुल चेन्ज झाल्यांनतर MG Comet 230 किलोमीटरपर्यंत धावू शकेल.
किंमत –
MG Motor ने ही इलेक्ट्रिक कार 7.98 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किंमतीत लॉन्च केली आहे. येत्या 15 मे पासून या गाडीचे बुकिंग सुरु होईल . भारतीय बाजारात ही कार Tata Tiago EV ला टक्कर देऊ शकते .