MG Comet EV फक्त 11,000 रुपयांत बुक करा; कुठे होतंय बुकिंग?

MG Comet EV booking
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एमजी मोटरने आपली नुकतीच लाँच झालेली इलेक्ट्रिक कार MG Comet EV चे बुकिंग सुरु केलं आहे. आकाराने अत्यंत लहान असलेली ही इलेक्ट्रिक कार तुम्ही फक्त ११ हजार रुपयांत खरेदी करू शकता. कंपनीने ही कार पेस,प्ले आणि प्लश या ३ व्हेरिएंटमध्ये आणली असून तिच्या पेस व्हेरिएंटची एक्स शोरूम किंमत ७,९८,०००/- रुपये तर टॉप मॉडेल प्लशची किंमत ९,९८०००/- रुपये आहे.

काय आहेत फीचर्स –

MG COMET EV गाडीचा आकाराच्या बाबतीत विचार केल्यास या गाडीची लांबी 2,974 mm ,रुंदीत 1,505 mm आणि उंचीत 1,640 mm आहे. तर गाडीला 2012 mm चा व्हील बेस मिळतो. MG Comet EV मध्ये ४ जण आरामात बसू शकतात. गाडीच्या फीचर्सच्या बाबतीत विचार केल्यास तीन usb पोर्ट्स,५५ हुन अधिक लिंक्ड फीचर्स, वायरलेस एंट्रॉयड ऑटो आणि एप्पल कार प्ले ,मॅन्युएल AC सेटिंग, key less कार एन्ट्री स्टिअरिंग व्हीलवर कंट्रोल पोजिशन, दोन १०.२५ इंच,स्मार्ट स्टार्ट सिस्टीम देण्यात आली आहे.

MG Comet EV मध्ये १७.३ kwh क्षमतेची बॅटरीचा वापर करण्यात आली आहे. ही बॅटरी ४२ एच पी पॉवर आणि ११० न्यूटन मीटर टार्क जनरेट करते.
एम जी कॉमेट ईवी गाडीसोबत ३.३ kwh चे ऑनबोर्ड चार्जर मिळते. एकदा पूर्ण चार्जिंग झाल्यानंतर हि गाडी सलग सात तास अविरत धावू शकते. कंपनीच्या दाव्यानुसार हि गाडी ५१९ रुपयांच्या खर्चात तब्बल १००० किमी धावू शकते . MG Comet EV मध्ये ३ ड्राईव्ह मोड ३ केईआरएस मोड मिळते .तसेच सुरक्षेसाठी फ्रंट ड्युएल एअर बॅग, ईबीडी सोबत एबीएस,फ्रंट व रियर ३ पॉईंट सीट बेल्ट्स रियर पार्किंग सेन्सर टायर प्रेशर मॉंनटरिंग सिस्टीम,आयसोफिक्स चाईल्ड सीट देण्यात आली आहे. २५० हुन अधिक कस्टमाइझेशन आणि ५ रंगात उपलब्ध असणारी देशातील सर्वात लहान इलेक्ट्रिक गाडी आहे. सध्या हि गाडी तिच्या विशेष फीचर्समुळे आपल्या ग्राहकांना आकर्षित करत आहे.

11,000 रुपयांत बुकिंग –

जर तुम्ही MG Comet EV खरेदी करण्याचा विचार केला असेल तर एमजी मोटरच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन या कारचे बुकिंग केले जाईल. वेबसाइटवर ‘E-Book your MG’ हा पर्याय निवडा आणि Comet EV पर्याय निवडा. यानंतर, बुकिंग रकमेचे 11,000 रुपये ऑनलाइन पेमेंट करा. आणि ही जबरदस्त कार बुक करा.