MG Comet EV : बाजारात लवकरच दाखल होणार भारतातील सर्वात लहान कार, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । MG Comet EV : सध्याच्या महागाईच्या काळात इलेक्ट्रिक गाड्या घेण्याकडे लोकांचा कल वाढतो आहे. सध्या बाजारात अनेक EV गाड्या देखील होत आहेत. आताही MG ची बहुप्रतिक्षित कॉमेट EV एप्रिल 2023 मध्ये भारतीय बाजारपेठेत सादर केली जाणार आहे. अलीकडेच MG Motor India ने त्याची ऑफिशियल इमेज उघड केली आहे. ज्यावरून ही EV 2 डोअर सेट-अपसहीत येणार असल्याचे दिसून येते. फक्त 2.9 मीटर लांबी असलेली ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात लहान कार असेल. वास्तविक ही कर टाटा नॅनोपेक्षाही लहान आहे. या नवीन मॉडेलची किंमत सुमारे 10 लाख रुपये (एक्स-शोरूम, भारत) असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच भारतीय बाजारपेठेत ही गाडी टाटा टियागो ईव्ही आणि सिट्रोएन eC3 शी स्पर्धा करेल.

MG Comet EV to be launched in India in April - CarWale

ही एक लांब आणि बॉक्सी स्टेन्स असलेली कॉम्पॅक्ट कार आहे. जी या ब्रँडच्या नवीन ग्लोबल स्मॉल इलेक्ट्रिक व्हेइकल्स (GSEV) प्लॅटफॉर्मवर डिझाइन केली जाईल. तसेच ही कार दिसायला इंडोनेशियामध्ये विक्री होत असलेल्या Wuling Air EV सारखीच आहे. यामध्ये चार्जिंग पोर्ट हे एमजी ब्रँडिंग अंतर्गत समोरच्या फॅशियाच्या मध्यभागी ठेवलेले आहे.

या कारचा लूक कसा आहे ???

या MG Comet EV कारच्या समोरच्या बाजूला ड्युअल, व्हर्टिकली स्टॅक्ड हेडलॅम्प, इंटीग्रेटेड टर्न इंडिकेटर्स सहीत एलईडी डेटाइम रनिंग लॅम्प आणि ड्युअल-टोन फ्रंट बंपर मिळेल. त्याच प्रमाणे विंडस्क्रीनच्या खाली क्रोम स्ट्रिपसहीत एक LED लाइट बार असेल जो ORVM ला मर्ज करण्यासाठी संपूर्ण रुंदीवर चालतो. तसेच या कारच्या सर्व मॉडेल्समध्ये ड्युअल-टोन कलर थीम असेल.

All-New MG Electric Car Named as Comet EV, India Launch Soon

मिळतील लेटेस्ट फीचर्स

कॉम्पॅक्ट डिझाइन असूनही या MG Comet EV कारद्वारे प्रवाश्यांना अनेक सुविधा मिळतील. यामध्ये ड्युअल-टोन शेडमध्ये लेयर्ड डॅशबोर्ड मिळेल. तसेच या छोट्या कारला स्लीक एअर-कॉन व्हेंट्स, एसी कंट्रोल्ससाठी पारंपरिक रोटरी नॉब्स, मल्टी-फंक्शनल टू-स्पोक स्टीयरिंग व्हील आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि टचस्क्रीन इन्फोटेनमेंट युनिटसाठी एक मोठा सिंगल-पीस स्क्रीन देखील मिळेल. याशिवाय यामध्ये ड्युअल 10.25-इंच डिस्प्ले असतील – एक इन्फोटेनमेंटसाठी आणि दुसरा इन्स्ट्रुमेंटेशनसाठी. यासोबतच ऑटोमॅटिक एअर कंडिशनिंग, कीलेस एंट्री, कनेक्टेड कार टेक आणि स्टीयरिंग माउंटेड कंट्रोल्स देखील मिळेल.

MG Comet EV to be company's affordable electric model for India - India Today

जबरदस्त रेंज

MG Comet EV वुलिंग एअर EV सहीत बॅटरी पॅक पर्याय मिळेल. याच्या एंट्री-लेव्हल व्हेरिएंटमध्ये 17.3kWh बॅटरी पॅक मिळू शकेल ज्याची अंदाजे रेंज 200kms असेल. तसेच याच्या हाय-एंड व्हेरिएंटमध्ये एका चार्जिंगवर सुमारे 300kms ची रेंज देणारा 26.7kWh बॅटरी पॅक असेल. MG Comet EV

हे पण वाचा :
आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर
Gold Price Today : देशांतर्गत बाजारात सोने-चांदी वधारली, तपासा आजचा नवीन दर
DigiLocker अ‍ॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence
Tax Saving Tips : ‘या’ 5 योजनांमध्ये गुंतवणूक करून वाचवा येईल टॅक्स, कसे ते जाणून घ्या
Bank Crisis : 2 आठवड्यात बुडाल्या 3 अमेरिकन बँका, अशावेळी भारतीय बँकांमध्ये आपले पैसे कितपत सुरक्षित आहेत जाणून घ्या