आता First Republic Bank लाही लागणार टाळे, आठवड्याभरात अमेरिकेतील तिसरी बँक दिवाळखोर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन बँकिंग क्षेत्रात घोंगावणारे वादळ काही केल्या शांत होईना. या दरम्यान सर्वात आधी सिलिकॉन व्हॅली बँक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सिग्नेचर बँक बंद झाली. याबरोबरच आता First Republic Bank लाही टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अवघ्या आठवडाभरातच अमेरिकेतील ही तिसरी मोठी बँक बंद झाल्याने परिस्थिती अत्यंत वाईट बनली आहे.

First Republic says its liquidity remains 'very strong' in bid to calm  nerves following Silicon Valley Bank's collapse

शेअर्समध्ये झाली जोरदार घसरण

ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्स नुसार, First Republic Bank च्या शेअर्समध्ये 61.83% ने घसरण झाली झाली. गेल्या आठवड्यातील घसरनीकडे पाहिल्यास,या बँकेच्या शेअर्सची किंमत 74.25% ने खाली आली आहे. तसेच शेवटच्या ट्रेडिंग दिवशी त्याची किंमत प्रति शेअर $19 च्या नीचांकी पातळीवर पोहोचली होती. अशीच काहीशी परिस्थिती सिलिकॉन व्हॅली बँक आणि सिग्नेचर बँकेमध्येही निर्माण झाली होती. त्यानंतर या दोन्ही बँकांना टाळे लावावे लागले. आता ही मोठी बँकही कोसळण्याची शक्यता व्यक्त होते आहे.

First Republic Stock Climbs on Earnings While Other Banks Tumble | Barron's

Moody’s ने ठेवले निरीक्षणाखाली

हे जाणून घ्या कि, जागतिक रेटिंग एजन्सी असलेल्या Moody’s ने ज्या सहा अमेरिकन बँकांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर First Republic Bank चे नाव समाविष्ट केले आहे. याशिवाय, या रेटिंग एजन्सीने Zions Bancorporation, Western Aliens Bancorp, Comerica Inc, UMB Financial Corp आणि Intrust Financial Corporation यांचे देखील रेटिंग कमी करत त्यांना निरीक्षणाखाली ठेवले आहे. याआधीही, Moody’s ने सिग्नेचर बँकेचेही डेट रेटिंग कमी करत त्यांना जंक टेरिटरीमध्ये आणले होते. या एजन्सीचे हे पाऊल म्हणजे अमेरिकन बँकिंग क्षेत्राला बसलेला मोठा धक्का असल्याचे मत तज्ञ व्यक्त करत आहेत.

First Republic shares jump as regional banks rebound from Monday's sell-off

2008 सारखी परिस्थिती

अमेरिकेत एका पाठोपाठ अशा बँका बंद होऊ लागल्यामुळे 2008 सारख्या मंदीचा धोका आणखी गडद होऊ लागला आहे. 2008 मध्येही बँकिंग फर्म लेहमन ब्रदर्सने स्वतःला दिवाळखोर घोषित केले होते. ज्यानंतर अमेरिकेसहीत संपूर्ण जगामध्ये आर्थिक मंदी आली होती. त्यावेळी अर्थव्यवस्थेचे जणू कंबरडेच मोडले होते. जर आपण अमेरिकेच्या बँकिंग इतिहासाकडे लक्ष दिले तर 2008 नंतर बँकिंग क्षेत्रातील दुसरे सर्वात मोठे शटडाउन म्हणजे सिलिकॉन व्हॅली बँक बंद होणे आहे. यानंतर लगेचच सिग्नेचर बँक आणि आता First Republic Bank च्या रूपाने आणखी एक बँक बंद होण्याच्या मार्गावर आहे.

First Republic Bank – AISNE

आणखी बँका बुडण्याची शक्यता

दरम्यान, अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील या बुडालेल्या बँकांच्या लिस्टमध्ये आणखी काही नावे जोडली जाण्याची शक्यता ज्येष्ठ अमेरिकन गुंतवणूकदार बिल एकमन यांनी व्यक्त केली आहे. सिलिकॉन व्हॅली बँकेच्या बंद होण्यामुळे अनेक बँकांवर परिणाम होईल. एकमन यांच्या मते, अमेरिकन प्राधिकरणाच्या हस्तक्षेपानंतरही अनेक बँका बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.firstrepublic.com/

हे पण वाचा :
10 हजारांपेक्षा कमी किंमत असलेला Realme C33 भारतात लाँच, असे असतील फीचर्स
एकापेक्षा जास्त PF Account असतील तर अशा प्रकारे करा विलीन अन्यथा होऊ शकेल त्रास
Share Market मध्ये सलग पाचव्या दिवशी घसरण, सेन्सेक्स 344 अंकांनी तर निफ्टी 71.15 अंकांनी खाली
Flipkart च्या बिग सेव्हिंग डेज सेलमधून सोनीचा 50 इंचाचा स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करण्याची संधी
Bank Loan : अल्प मुदतीचे कर्ज घेण्याआधी त्यामधील ‘या’ 3 धोक्यांविषयीची माहिती जाणून घ्या