व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

DigiLocker अ‍ॅपद्वारे अशाप्रकारे आपल्या स्मार्टफोनमध्ये ठेवा Driving Licence

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात कुठेही वाहन चालवताना आपल्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence) असणे आवश्यक आहे. याशिवाय वाहन चालवताना पकडले गेल्यास मोठा दंड भरावा लागू शकतो. मात्र आजकालच्या धावपळीच्या बहुतेकदा आपण लायसन्स आपल्या वॉलेटमध्ये ठेवण्यास विसरतो. अशा परिस्थितीत पकडले गेल्यास अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. मात्र आता आपले ड्रायव्हिंग लायसन्स स्मार्टफोनमध्ये सुरक्षित डिजिटल कॉपी म्हणूनही स्टोअर करता येऊ शकते आणि ते ओरिजिनल ड्रायव्हिंग लायसन्स इतकेच वैध देखील आहे.

ड्राइविंग लाइसेंस नया नियम: घर बैठे मिनटों में अपना ड्राइविंग लाइसेंस करा  सकते हैं रिन्यू, यहां जानें क्या है पूरी प्रक्रिया

हे लक्षात घ्या कि, आता डिजीलॉकर अ‍ॅपद्वारे आपल्या फोनवर ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी देखील डाउनलोड करता येते. DigiLocker अ‍ॅप हे सरकार मान्यताप्राप्त अ‍ॅप आहे. जे Google Play Store किंवा App Store वरून डाउनलोड करता येते. DigiLocker अ‍ॅप द्वारे आपले डॉक्युमेंट्स स्कॅन करून ते सुरक्षित ठेवता येतात. त्यामुळे जर कधी आपण फिजिकल कॉपी विसरलात तर हे अ‍ॅप उघडून त्यामध्ये सेव्ह केलेले Driving Licence दाखवा.

How to get DigiLocker App, download digilocker app, access CBSE Board mark  sheet, certificates | Apps News – India TV

डिजीलॉकरमध्ये Driving Licence सेव्ह करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे :

Google Play Store किंवा App Store वर जाऊन DigiLocker अ‍ॅप डाउनलोड करा.
यानंतर डिजिलॉकर खात्यामध्ये साइन-इन करा किंवा डिजिलॉकरवर खाते नसेल तर क्रिएट अकाउंट या पर्यायावर क्लिक करा.
आता डॉक्युमेंट ऑप्शनमध्ये ट्रान्सपोर्ट पॅनल शोधा. येथे Driving Licence चा पर्याय मिळेल, तो निवडा.
यानंतर ट्रांसपोर्ट डिपार्टमेंटबाबत विचारणा केली जाईल. ज्यामध्ये रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाची निवडा.
आता ड्रायव्हिंग लायसन्स नंबर टाका.
यानंतर Get Document वर क्लिक करा.
आता ड्रायव्हिंग लायसन्स डिजीलॉकरमध्ये सेव्ह होईल.

You Can Now Add Nominee To Your DigiLocker, Check Out The Steps Here-  Technology News, Firstpost

अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.digilocker.gov.in/

हे पण वाचा :
Freedom 251 Scam : जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन घोटाळ्याविषयी जाणून घ्या
Kotak Mahindra Bank कडून ग्राहकांना मोठा धक्का, कर्जावरील व्याज दरात केली वाढ
EDLI Scheme म्हणजे काय ??? जाणून घ्या त्याच्याशी संबंधित ‘या’ खास गोष्टी
Aadhar Card अपडेट करण्यासाठी 14 जूनपर्यंत द्यावे लागणार नाहीत पैसे, अशा प्रकारे करा अपडेट
Komaki LY Pro : दोन बॅटरी असलेली ‘ही’ गाडी एका चार्जमध्ये देते 180 किमी पर्यंतची रेंज, किंमत जाणून घ्या