औरंगाबाद : महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेतून शहरात सायकल चालविण्यासाठी स्वतंत्रपणे 20 किमीचा सायकल ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन पाठोपाठ आता एमजीएम ते सेंटरल नाका आणि टीव्ही सेंटर ते सलीमअली सरोवर रस्त्याच्या दोन्ही बाजूने सायकल ट्रॅक बनविला जाणार असल्याचे मनपा प्रशासन तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी सांगितले.
पहिल्या टप्प्यात क्रांती चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान सहा कि.मी.चा सायकल ट्रॅक तयार करण्यात आला आहे. ‘सायकल ट्रॅकची काळाची गरज आहे आणि नागरिकांचा तो अधिकार आहे त्यादृष्टीने काम केले जात आहे’. असे आस्तिक कुमार पाण्डेय म्हणाले.
सायकल ट्रॅक बनविण्यासाठी 192 कोटींच्या रस्त्यामध्ये नियोजन करण्यात आले आहे त्याबरोबरच एमजीएम ते सेंट्रल नाका टीव्ही सेंटर ते सलीम अली सरोवर रस्ताच्या दोन्ही बाजूने सायकल ट्रॅक तयार केला जाणार आहे. हा सायकल ट्रॅक चार कि.मी.चा असेल. एमजीएम ते सेंट्रल नाका सिमेट रस्त्यांचे काम पूर्ण झाले असून डिव्हायडर तयार करण्यात आले आहेत.