हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | म्हाडा ही नागरिकांना नेहमीच परवडणाऱ्या किमतींमध्ये त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करून देत असते. अशातच म्हाडाने पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील 477 घरांची सोडत जाहीर केली होती. या म्हाडाच्या सोडतीसाठी नागरिकांना 8 एप्रिलपर्यंत अर्ज करण्याची मुदत देखील केलेली होती. परंतु आता म्हाडाने याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आता म्हाडाच्या (Mhada House) या घरासाठी अर्ज करण्याची मुदत वाढ केलेली आहे. आता नागरिकांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करण्यासाठी 30 मे 2024 ही शेवटची तारीख असणार आहे.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील म्हाडाच्या (Mhada House) सोडतीसाठी नोंदणी करण्यास 7 मार्च 2024 पासून सुरुवात झालेली आहे. या सोडतीमध्ये म्हाडाच्या योजनेअंतर्गत प्रथम येणाऱ्यास त्याला प्राधान्य तत्त्वावर 2416 घरे त्याचप्रमाणे विविध योजनेतील 18 घरे, म्हाडाच्या पीएमएवाय योजनेमध्ये एकूण 60 घरे आणि पीएमएवाय खाजगी भागीदारीच्या योजनेत 978 घरे, त्याचप्रमाणे पुणे मनपामध्ये 745 घरे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 561 घराची सोडती होणार आहे. ही पुण्यातील एक सगळ्यात मोठी म्हाडाची सोडती असणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी मुदतवाढ केलेली आहे. अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी अशोक पाटील यांनी दिलेली आहे.
ऑनलाइन अर्ज कसा करावा | Mhada House
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तिथे सविस्तर माहिती दिलेली असेल आणि म्हाडाच्या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करता येईल.