हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mhada Housing) प्रत्येक माणसाचं स्वतःचं घर असावं, असं एक स्वप्न असतं. या स्वप्नासाठी प्रत्येकाची शक्य तेव्हढे प्रयत्न करायची तयारी असते. खास करून बड्या शहरात आपलं हक्काचं घर असावं, म्हणून प्रत्येकाची धडपड सुरु असते. वयाची अर्धी वर्ष निघून जातात आणि तरीसुद्धा बऱ्याच लोकांना मुंबईत घर घेणे होत नाही. आयुष्यात पाहिलेलं एक महत्वाचं स्वप्न स्वप्नचं राहतं. याच कारण म्हणजे, घराच्या वाढत्या किंमती. आजही कित्येक तरुण मंडळी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण ते पूर्ण होईल का? याची शाश्वती नसताना एक आशेचा किरण दिसू लागला आहे. एकीकडे घरांच्या किंमती आकाशाला भिडत असताना दुसरीकडे म्हाडाच्या साथीने अनेकांच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार असे दिसत आहे.
स्वप्नपूर्ती होणार
आता मुंबईत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकत. कारण या स्वप्नांना म्हाडा आणि सिडको सारख्या गृहनिर्माण संस्था आशेचं बळ देत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकसुद्धा आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न बिनघोर पाहू शकतात. (Mhada Housing) या गृहनिर्माण संस्थांच्या माध्यमातून बड्या शहरांमध्ये अनेक घरे उभारली जातात आणि सोडतीच्या माध्यमातून ही घरे परवडणाऱ्या किमतींमध्ये विकली जातात. दरम्यान, मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घ्यायचे अनेकांचे स्वप्न आता म्हाडाच्या माध्यमातून लवकरच पूर्ण होणार आहे. तशी नवी संधी लवकरच सर्वसामान्यांना मिळणार आहे.
मुंबईत म्हाडा उभारणार नवीन घरे (Mhada Housing)
वृत्तानुसार, येत्या कालावधीत म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून मुंबईत ३ हजार ६०० नव्या घरांची निर्मिती करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या घरांसाठी विविध उत्पन्न गटातील नागरिकांना अर्ज करण्याची संधी दिली जाणार आहे. सन २०२४- २५ या आर्थिक वर्षात म्हाडाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी नव्या घरांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये गोरेगाव, कन्नमवार नगर, अँटॉप हिल, पवई आणि मागाठाणे या भागांचा समावेश आहे. या घरांची उभारणी झाल्यानंतर लगेच पुढील कालावधीत म्हाडाकडून या घरांसाठी सोडत जाहीर केली जाईल. त्यामुळे अनेकांच्या घराचे लवकरच स्वप्न पूर्ण होणार आहे.
गतवर्षीच्या शिल्लक घरांचा होणार समावेश
गतवर्षी २०२४ मध्ये म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या माध्यमातून एकूण ४०८२ घरांसाठी सोडत जाहीर झाली होती. तेव्हा सोडतीदरम्यान या घरांमधून १५० घरांची विक्री अद्याप झालेली नाही. (Mhada Housing) त्यामुळे येत्या कालावधीतील प्रतीक्षा यादीत ज्या अर्जदारांचे नाव असेल त्यांना ही घरे उपलब्ध करून दिली जाण्याची शक्यता आहे. तशी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या पद्धतीने पुन्हा ही घरे अशीच राहिली तर येणाऱ्या कालावधीत नव्याने उभारण्यात येणाऱ्या ३६०० घरांमध्ये शिल्लक १५० घरांचा समावेश होऊ शकतो.
न केवळ मुंबई तर इतर राज्यातही उभारणार घरे
म्हाडा गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून सन २०२४ – २५ या आर्थिक वर्षात न केवळ मुंबई तर महाराष्ट्रातील अजून काही राज्यांमध्ये घरांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती आणि नागपूरचा समवेश आहे. (Mhada Housing)