हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mhada Lottery 2025 । मुंबईकरांना स्वस्तात मस्त आणि कमी पैशात स्वतःचे हक्काचे घर खरेदी करता यावे यासाठी म्हाडाने तब्बल 5,285 घरांसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीच्या माध्यमातून ठाणे, पालघर, बदलापूर, सिंधुदुर्ग आदी भागांत घरं उपलब्ध होणार आहेत. १४ जुलैपासून यासाठी अर्ज सुरु झाले असून माधयमवर्गीय कुटुंबासाठी हि सर्वात मोठी संधी आहे. मात्र म्हाडा मधून घर खरेदी करण्यासाठी पात्रता काय असावी ? कोणकोणती कागदपत्रे लागतात ? आणि म्हाडाचा अर्ज कशा पद्धतीने भरायचा असतो हे तुम्हाला माहितेय का? नसेल तर आज आम्ही सांगतो.
म्हाडाच्या घरांसाठी पात्रता काय ? Mhada Lottery 2025
अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे
मागील 20 वर्षांत किमान 15 वर्षे महाराष्ट्रात रहिवासी असणे आवश्यक आहे
अधिवास प्रमाणपत्र (domicile certificate) तसेच address proof आवश्यक आहे
अर्जदार उपयुक्त उत्पन्न गटात बसावा
कोणकोणती कागदपत्रे लागतात?
आधार कार्ड, पॅन कार्ड (Mhada Lottery 2025)
रहिवासी दाखला
अधिवास प्रमाणपत्र
उत्पन्न प्रमाणपत्र
बँक खाते तपशील, पासपोर्ट फोटो
स्वाक्षरीचा फोटो
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइट https://housing.mhada.gov.in/ ला जाऊन भेट द्या.
यानंतर रजिस्ट्रेशन करा. त्यासाठी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका. (Mhada Lottery 2025)
नोंदणी झाल्यावर लॉगिन करून हवी असलेली योजना निवडा आणि अर्ज भरा
अर्ज भरताना काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
आता ठराविक अनामत रक्कम ऑनलाइन पद्धतीने भरा आणि अर्ज सबमिट करा.
अधिक माहितीसाठी https://lottery.mhada.gov.in येथे भेट द्या.
दरम्यान, कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही लॉटरी पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे.
१) २० टक्के सर्वसमावेशक योजनेंतर्गत ५६५ सदनिका,
२) १५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेंतर्गत ३००२ सदनिका,
३) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहेत त्या स्थितीत या योजनेंतर्गत १६७७ सदनिका, Mhada Lottery 2025
४) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्यास सदनिका) ४१ घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
५) म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेंतर्गत ७७ भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
लॉटरीसाठी (Mhada Lottery 2025) स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता ‘म्हाडा’च्या https://housing.mhada.go v.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादीवरील दावे व हरकती नोंदविण्याची अंतिम तारीख 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत आहे. त्यानंतर, सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी 1 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरी साठी अर्ज भरताना अर्जदारांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी ०२२ – ६९४६८१०० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी केले आहे.




