Mhada Mumbai : खुशखबर ! म्हाडाकडून लवकरच 2 हजार घरांसाठी लॉटरी ; गोरेगाव सह ‘या’ घरांचा समावेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mhada Mumbai : प्रत्येकालाच आपलं हक्काचं घर असावं अशी इच्छा असते. मात्र सध्या घरांचे वाढलेले दर पाहता हे स्वप्न पूर्ण करणं म्हणजे एका चॅलेंज शिवाय काही कमी नाही. त्यातही पुणे, मुंबईसारख्या शहरांमध्ये स्वतःचे घर घ्यायचं म्हटलं तर लाखो करोडो रुपये मोजावे लागतात. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या स्वप्नांना बळ देण्याचं काम म्हाडाकडून केलं जातं. म्हाडा कडून परवडणाऱ्या किमतीमध्ये घरांची (Mhada Mumbai) उपलब्धता करून दिली जाते.

मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास मुंबईमधल्या मोक्याच्या जागांवर म्हाडा घरं उपलब्ध करून देत आल्यामुळे म्हाडामधून मुंबईमध्ये घरं घेणाऱ्यांची संख्या मोठी असते. मुंबईकरांसाठी एक खुशखबर असून म्हाडा प्राधिकरण लवकरच दोन हजार घरांची लॉटरी (Mhada Mumbai) काढणार असून यामध्ये गोरेगाव, पवई आणि विक्रोळी येथील घरांचा यामध्ये समावेश असणार आहे. तर सर्वाधिक घरं ही गोरेगाव भागातील असणार असून या घरांच्या किमती या 34 लाखांपासून सुरू होतील अशी माहिती म्हाडाच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. यासाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.

असे असले तरी अद्याप या लॉटरीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांच्या म्हणण्यानुसार विधानसभा निवडणुकीनंतर ही लॉटरी काढली जाणार असल्याची शक्यता अधिक आहे म्हाडाकडून (Mhada Mumbai) पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर केला जात असून पारदर्शकता यावी यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली अंमलात आणण्यात आली आहे.

2023 मध्ये म्हाडा कडून गोरेगाव आणि विक्रोळी या दोन जागांसाठी सोडत काढण्यात आली होती. मात्र यंदाच्या (Mhada Mumbai) सोडती मध्ये उपलब्ध असणाऱ्या घरांमधून उरलेल्या घरांच्या बरोबरच इतरही ठिकाणच्या घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे.