Mhada Mumbai : मुंबई – पुणे सारख्या मोठ्या शहरांमध्ये सर्वसामान्य माणसाला आपल्या हक्काचं घर देणारी संस्था म्हणून म्हाडाचं नाव प्रचलित आहे. मात्र मागच्या काही दिवसांपासून म्हाडाची घर सुद्धा अल्प उत्पन्न गट किंवा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याच्या बाहेर गेलेली दिसून येत आहेत. मात्र एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी म्हाडाच्या घरांची किंमत कमी होणार असल्याची माहिती (Mhada Mumbai) दिली आहे. चला जाणून घेऊयात…
… म्हणून किंमती जास्त (Mhada Mumbai)
मुलाखतीतील प्रश्नाला उत्तर देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे म्हाडाच्या घराच्या किमती का वाढल्या आहेत याचे उत्तर जयस्वाल यांनी दिलं. त्यांनी म्हटलं की, म्हाडाच्या 33 (5) आणि 33 (७) अंतर्गत सरप्लस टेनमेंट्स म्हणून रिकामी घर भाड्याला प्राप्त होतात. त्यांची किंमत रेडी रेकनरच्या दराच्या 110% आकारणाबाबत जे धोरण आहे त्यानुसार किमती आकारलया आहेत. यातील बरीच घर दक्षिण मुंबई मधील मोक्याच्या ठिकाणी असल्याने तेथील रेडी रेकनर दर जास्त आहेत त्यामुळे किंमत काहीशी जास्त आहे असं त्यांनी (Mhada Mumbai) सांगितलं.
दुसऱ्या एका प्रश्नाला उत्तर देताना जयस्वाल म्हणाले रेडी रेकनरशी संबंधित विक्री किंमत निश्चित करण्याचा धोरण आहे. त्यामुळे सरप्लस अंतर्गत मिळालेल्या घरांच्या किमतीत जास्त आहेत तर कमी करण्याबाबतच लवकरच निर्णय घेण्यात येणार (Mhada Mumbai) आहे. म्हाडाला ज्या ठिकाणी नाममात्र दराने जमिनी मिळालया आहेत अशा जमिनीवरील प्रकल्पातील घरांच्या किमती या बिल्डरकडे उपलब्ध असलेल्या घरांच्या 40% ते 50 टक्क्यांहून कमी आहेत. गोरेगाव मधील मध्यम उत्पन्न गटातील 700 चौरस फुटांच्या घरांच्या किमती 1 कोटी 10 लाख आहेत तर प्रत्यक्षात या घराची बाजारभावानुसार किंमत दोन कोटींच्या आसपास आहे. त्यामुळे नाममात्र दरात मिळालेल्या जमिनीवरील म्हाडाची घरे महाग आहेत असं म्हणणं संयुक्तिक होणार नाही. असे जयस्वाल यांनी स्पष्ट केलं.
नव्या लॉटरीत या ठिकाणी उपलब्ध होणार घरं (Mhada Mumbai)
सध्या मुंबई येथील घरांची सोडत निघाली असून यामध्ये गोरेगाव आणि इतर भागांचा समावेश आहे. मात्र नव्या लॉटरी मध्ये कोणत्या ठिकाणच्या घरांचा समावेश असणार आहे याची माहिती जयस्वाल यांनी दिली. त्यांनी सांगितलं की कोपरी, पवई, बोरीवली, पहाडे गोरेगाव, वरळी तसेच संक्रमण गाळे व पुनर्रचित गाळ्यातून मिळणाऱ्या घरांची संख्या पाहतात पुढील वर्षीच्या लॉटरीसाठी मुंबईत ३६६० घर उपलब्ध (Mhada Mumbai) असतील. तर कोकण मंडळात शिरढोण, गोठेघर, खोडी येथील योजना प्रगतीपथावर असून तिथे चार हजार 47 घर म्हाडाला मिळणार आहेत. या घरांच्या किमती 18 ते 25 लाख असतील असेही त्यांनी सांगितले.