सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
मिरज तालुक्यातील खटाव गावात सध्या म्हैशाळ योजनेचे पाणी चालू आहे. वाघावकर वस्ती येथील पोट कालव्यातून सध्या शेतकऱ्यांना पाणी देण्याचे काम सुरू आहे. एकीकडे खटाव गावातील शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत तर कर्नाटकातील विहीरीना पाणी देण्याचे काम सुरू आहे.
गेल्या काही दिवसंपासुन सलगरे येथील शेतक-यांनी आपल्या विहरींमधुन पाणी कर्नाटकात नेले होते परिणामी तहसीलदारांनी पाहाणी करुन विद्युत पुरवठा खंडीत केला होता. आता हाच प्रकार जानराववाडी व खटाव मध्येही सुरु असुन खटावमधील जाधव वस्ती, जगदाळे वस्ती मधील अनेक शेतकर्यानी पैसे भरून देखील आधिकारी पाणी देत नाहीत. उलट आर्थिक व्यवहार करुन बिनधास्तपणे म्हैशाळ योजनेचे पाणी कर्नाटक राज्यात देत आहेत या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खटाव गावातील शेतकरी करत आहेत. पाण्याची चोरी होत असल्याने ज्या शेतक-यांनी पैसे भरले आहेत त्यांच्यापर्यंत पाणी पोहचत नसल्याने शेतक-यांमधुन संताप व्यक्त होत आहे.
जाधव वस्ती, भूपती वस्ती, लोहार वस्ती, जगदाळ वस्ती, येथील शेतकऱ्यानी मागील एक वर्षा पासून म्हैशाळ योजनेचे आधिकारी ऐनापुरे सर्व वस्तीतील शेतक-याना पाणी पट्टी भरण्यास तयार असताना सर्व पाणी दिले नाही. सर्व शेतकरी पाणी मिळावे म्हणून ऐनापुरे यांना पाणी पट्टीचे पैसे आठ दिवस आगोदर भरले तरी शनीवारी पाणी सोडले. पाणी सोडलेल्या कालव्यातून आठ ते दहा शेतकऱ्यानी मोटारी बसवून पाणी उचलू लागले आहे ते पण पाणी पट्टी भरतच नाहीत त्यामुळे पाणी पूर्ण क्षमतेने येत नाही. सर्व शेतकरी पैसे भरून पाणी आणायचे दुसरीकडे ऐनापुरे यांनी पाणी पट्टी न घेताच त्यांना पाणी कसे दिले ? असा प्रश्न ग्रामस्थ व शेतकरी करत आहेत. या सर्व प्रकरणाची चौकशी करून ऐनापुरे यांच्यावर कारवाई करावी अन्यथा जिल्हा आधिकारी कार्यालय समोर आंदोलन करणार असल्याचा इशारा नेताजी जाधव, राहूल भूपती, दिलीप लोहार, सेतकरी यांनी दिला आहे.