आज म्हसवड बंद : श्री. सिध्दनाथ आणि जोगेश्वरी देवीचा रथोत्सव रद्द केल्याने प्रशासनाचा निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

म्हसवड येथील श्री. सिध्दनाथ आणि जोगेश्वरी देवीचा रथोत्सव सोहळा रद्द  करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ओमिक्रोन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून हा निर्णय घेतला आहे. मात्र आता प्रशासनाच्या या निर्णया विरोधात म्हसवड ग्रामस्थांनी आज शनिवारी दि. 4 रोजी बाजारपेठ बंद ठेवून प्रशासनाचा निषेध केला आहे.

राज्यासह राज्याबाहेरील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री. सिध्दनाथ आणि जोगेश्वरी देवीचा रथोत्सव उद्या रविवारी दि. 5 रोजी होणार होता. मात्र व्यवस्थापन प्राधिकरण समिती व प्रशासनाच्या बैठकीत रथोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता स्थानिक नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक नागरिकांना सोबत घेवून प्रशासनाला रथोत्सव साजरा करण्याची विनंती केलेली आहे.

म्हसवड येथील मोठा धार्मिक सोहळा रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर आज शनिवारी दि. 5 रोजी ग्रामस्थांनी मुख्य बाजारपेठेसह शहरातील दुकाने बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला आहे. प्रशासनाने अडमुठी भूमिका घेतली असून माण तालुका प्रांत व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. रथोत्सव कोणत्याही परिस्थिती व्हावा, आमच्या भावनेचा विषय असून त्यास रथोत्सवास परवानगी देण्याची मागणी नागरिकांनी केलेली आहे.