सातारा शहरात महाआरती तर प्रतापगडावर प्रशासाने केली शिवजयंती उत्साहात

Shivaji Maharaj Maha Aarti

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके जिल्हा प्रशासनाच्या वतीने किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. तर राजधानी साताऱ्यात शिवजयंतीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पोवई नाक्यावर असणाऱ्या शिवतीर्थावर खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मातोश्री राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले यांनी शिवतीर्थ येथे येऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. यानंतर … Read more

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अचानक सातारा दाैऱ्यावर : प्रशासनाची पळापळ

Eknath shinde

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातारा जिल्हा दौऱ्यावर आज येत आहेत. आज सकाळी 11 वाजता दरे गावात मुख्यमंत्र्याचे आगमन होणार आहे. मुख्यमंत्री अचानक महाबळेश्वर दाैऱ्यावर येणार असल्याने प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या गावात आज येणार आहेत. खासगी कारणाने मुख्यमंत्री गावी येणार … Read more

पाटण तालुक्यात पुन्हा भूस्खलन : प्रशासन सतर्क

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील डोंगर- दऱ्यातील पाटण तालुक्यात सलग दुसऱ्या वर्षी भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या 4-5 दिवसांपासून पाटण तालुक्यासह जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. काटे- अवसरी परिसरातील खुडपुलेवाडी आणि जितकरवाडी येथे भूस्खलन झाल्याचे ट्विट प्रातांधिकारी सुनील गाढे यांनी केले आहे. #सातारा #पाटण तालुक्यातील काटे अवसरी परिसरातील खुडपुले वाडी येथे … Read more

जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासाठी कुठे संपर्क करायचा ते पहा : कराडला NDRF टीम दाखल

सातारा | जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये आपत्ती व्यवस्थापन व आपत्ती निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच खबरदारीच्या उपायोजना म्हणून एनडीआरएफचे एक पथक आवश्यक त्या साहित्यासह कराड येथे दाखल झाले आहे. या आपत्ती व्यवस्थापन कक्षांमध्ये तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या दुर्घटनांबाबत सूचना देण्याकरिता तसेच अनुषंगिक माहितीसाठी तहसील कार्यालयांमधील दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी … Read more

महाबळेश्वर येथे प्रशासनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाबळेश्वर तालुक्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पार ग्रामपंचायतीला जाण्यासाठी 150 वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला तरी अद्याप रस्ता नाही. तर गावाला जोडणाऱ्या नदीवरील पूल वाहून गेल्याने ग्रामस्थांचे अतोनात हाल होत आहेत. रुग्ण, शालेय विद्यार्थी, गरोदर महिला यांना रस्ता नसल्याने पायपीट करावी लागते. वेळप्रसंगी रुग्णांना झोळीच्या साहाय्याने रुग्णालयात न्यावे लागते. पावसाळ्यात नदी … Read more

साताऱ्यात सर्व तालुक्यासाठी राष्ट्रीय लोकअदालतीचे 12 मार्चला आयोजन

Crime

सातारा | सातारा मुख्यालयात आणि जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयात दि. 12 मार्च 2022 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा न्यायालयात लोकअदालतीचे उद्घाटन सातारा जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.जे.धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृप्ती जाधव यांनी कळविले आहे. या लोक अदालतीत धनादेश न वटलेली प्रकरणे, वादपूर्व … Read more

कराड शहरातील आग प्रकरणी प्रशासन योग्य ती कारवाई करेल : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी शहरात आग लागली तेथे व्यवसाय सोडून काही अनावश्यक गोष्टी दिसत आहेत. लोकवस्ती दाट असल्यामुळे अगीने राैद्ररूप धारण केले. प्रशासन ही घटना घडल्यानंतर योग्य ती कारवाई करेल. शहरात अशाप्रकारे असणाऱ्या वस्ती, घरांवर प्रशासन निश्चितपणे कारवाई करेल, असा इशारा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिला आहे. कराड शहरातील वेशा वस्तीत मध्यरात्री आग लागून … Read more

खिरखिंडी येथील विद्यार्थ्यांना प्रशासनाकडून फायबर बोटीची व्यवस्था

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके खिरखिंडी (ता. जावली) येथील विद्यार्थ्यांना अंधारी-कास (ता. जावली) येथील कसाई देवी प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येथे जाण्यासाठी प्रशासनाच्यावतीने फायबर बोटीची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. प्रशासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी, सातारा, जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी, तहसीलदार जावली व गट विकास अधिकरी जावली यांनी मौजे खिरखिंडी येथे भेट … Read more

कोयना नदीकाठी हाैदोस : चार जेसीबीसह 30 ट्रॅक्टरने तांबडी मातीचा उपसा, प्रशासन झोपेत

कराड | कराड तालुक्याचे तहसीलदारासह महसूल विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. प्रशासनातील अधिकारी कोरोना बाधित असल्याची माहिती असल्याने कोयना नदीकाठी वीट भट्टीसाठी लागणारी तांबडी मातीचा उपसा मोठ्या प्रमाणावर सुरू केला आहे. कराड शहराजवळ असलेल्या मलकापूर शहराच्या हद्दीत वीट भट्टीसाठी तब्बल चार जेसीबी आणि 30 ट्रॅक्टरच्या सहाय्याने माती उपसा सुरू आहे. अशावेळी प्रशासनाचे अधिकारी … Read more

प्रशासन यंत्रणा सज्ज : कराडला दोन ऑक्‍सिजन प्लांट सुरू

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोविडचा फैलाव पुन्हा वाढू लागला आहे. त्यामुळे प्रशासनाने बेडसह अन्य यंत्रणेची सज्जता ठेवली आहे. कोविडचे रुग्ण वाढल्यावर त्यांचे ऑक्‍सिजन कमी येते. मध्यंतरी ऑक्‍सिजन न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावे लागले. त्याचा विचार करून प्रशासनाने कराड येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात ऑक्‍सिजन प्लांट कार्यान्‍वित केला आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या वाढत्या ऑक्‍सिज ऑक्‍सिजनच्या बाबनची … Read more