महाराष्ट्रात CET परीक्षा कधी? मंत्री उदय सामंतांनी दिली महत्त्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: इयत्ता बारावी नंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी महत्त्वाची असणारी सीईटी CET परीक्षेच्या बाबतीत मंत्री उदय सामंत यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही परीक्षा आयोजित केली जाऊ शकते अशी माहिती महाराष्ट्राचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

याबाबत बोलताना उदय सामंत म्हणाले. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या महाविद्यालयांमध्ये वर्ग घेण्यात येणार नाही. यात ऑनलाईन क्लास सुरू राहतील. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटीची परीक्षा होऊ शकते असं उदय सामंत यांनी सांगितले.

दरम्यान राज्य कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलने महाराष्ट्र सीईटी 2021 परीक्षेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक वर्षाच्या 2021 – 22 वर्षाच्या पहिल्या वर्षांमध्ये प्रवेश घेण्याची तयारी करणारे विद्यार्थी सात जुलैपर्यंत हा अर्ज ऑनलाईन करू शकतात याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. महाराष्ट्र राज्य कॉमन एन्ट्रन्स टेस्ट सेल्ल पीसीएम आणि पीसीबी या दोन्ही गटांसाठी एमएचटी-सीईटी 2021 चा पॅटर्न जाहीर केला. याशिवाय परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू होणार नाही. परीक्षार्थींनी नोंद घ्यावी की सीईटीची गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र चा पॅटर्न जेईई-मेन सारखा असेल तसंच जीवशास्त्र विषय असताना परीक्षेचा पॅटर्न नीट सारखा राहील. यासह एमएचटी-सीईटी 2021 चा पेपर मध्ये विचारले जाणारे प्रश्न प्रामुख्याने एप्लीकेशन बेस्ड असणार आहेत.

Leave a Comment