नवी दिल्ली । इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन याला दोन खेळाडूंनी लावलेल्या वर्णद्वेषाच्या आरोपांमुळे बीबीसीच्या कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले आहे. वॉन गेल्या 12 वर्षांपासून बीबीसी फाइव्ह लाइव्ह शो ‘द टफर्स अँड वॉन क्रिकेट शो’मध्ये एक्सपर्ट म्हणून काम करत होता. 2009 मध्ये यॉर्कशायर येथे झालेल्या सामन्यापूर्वी वॉनने त्याच्यावर आणि इतर खेळाडूंवर वर्णद्वेषी टिप्पणी केल्याचा दावा करत अझीम रफिकने त्याच्यावर वर्णद्वेषाचा आरोप केला होता.
एक दिवसापूर्वीच वॉनने खुलासा केला की, यॉर्कशायरचा माजी खेळाडू अझीम रफिकने त्याच्यावर वर्णद्वेषी वर्तनाचा आरोप केला आहे. मात्र, त्याने हे आरोप ठामपणे फेटाळून लावत लिस्ट मधून आपले नाव वगळण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचे सांगितले. ‘डेली टेलीग्राफ’ कॉलममध्ये, वॉनने कबूल केले की यॉर्कशायर संघातील संस्थात्मक वर्णद्वेषाच्या रफीकच्या आरोपांच्या चौकशीमध्ये उल्लेखित तो “माजी खेळाडू” होता.
वॉनने 1991 ते 2009 मध्ये निवृत्ती घेईपर्यंत यॉर्कशायर काउंटी संघाचे प्रतिनिधित्व केले. यॉर्कशायरच्या अझीम रफिकच्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे की, त्याने रफिकसह आशियाई खेळाडूंच्या एका गटाला सांगितले की,”या गटात तुमच्यासारखे बरेच खेळाडू आहेत, आम्हाला याबद्दल काहीतरी करण्याची गरज आहे.’ विरुद्धच्या सामन्यादरम्यान तो मैदानात उतरला होता. व्यावसायिक खेळाडू म्हणून रफिकचा हा पहिलाच हंगाम होता. वॉन म्हणाला की, डिसेंबर 2020 मध्ये, कथित घटनेच्या 11 वर्षांनंतर, क्लबमध्ये संस्थात्मक वर्णद्वेषाच्या रफिकच्या दाव्यांकडे लक्ष देणाऱ्या समितीकडून बोलण्यासाठी त्याच्याशी संपर्क साधण्यात आला.”
ते म्हणाले,”मी समितीला असे उत्तर दिले की, हे ऐकून मला राग आला आहे. या कथित घटनेला 11 वर्षे पूर्ण झाली. त्या सामन्यादरम्यान किंवा गेल्या 11 वर्षात कधीही त्याची चौकशी झाली नाही. त्यावेळी माझ्या डोक्यावर कोणीतरी दगड मारल्यासारखे वाटले. मी 30 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे आणि खेळाडू किंवा समालोचक या नात्याने माझ्यावर अशा कोणत्याही घटनेचा किंवा शिस्तभंगाचा आरोप झालेला नाही.”