हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महत्वाचा विषय असलेला व सुमारे आठ महिन्यापासून प्रलंबित असलेला विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. त्यावरुन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार होते. दरम्यान सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे राज्यपाल भगतसिह कोशारी यांची भेट घेण्यासाठी दाखल झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या नियुक्तीच्या प्रश्नी आज संध्याकाळी 6 वाजता महाविकास आघाडीचे नेते राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेणार होते. मात्र, आज होणारी ही भेट रद्द झाली. मात्र, या भेटीच्या वेळेत बदल झाला आहे. राज्यपालांनाकडून महाविकास आघाडी सरकारला भेट नाकारली असल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकर हे राजभवनात दाखल झालेले आहेत. नियोजित वेळेनुसार हि भेट घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.