हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. यावेळी सुरुवातीलाच घडलेल्या एका घटनेनं सर्वांचे लक्ष्य वेधलं. ठाकरे गटाचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे म्हणून ओळखले जाणारे मिलिंद नार्वेकर हे आमदार नसतानाही सभागृहात दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं. त्यानंतर आदित्य ठाकरेंनी चूक निदर्शनास आणल्यानंतर नार्वेकर बाहेर गेले.
राज्यपालांच्या अभिभाषणासाठी मिलिंद नार्वेकर सभागृहात येऊन बसले. नार्वेकरांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांची चूक लक्षात आणून देताच नार्वेकर उठून बाहेर गेले. प्रेक्षक गॅलरी समजून चुकून सेंट्रल हॉलमध्ये जाऊन बसलो असे स्पष्टीकरण मिलिंद नार्वेकर यांनी दिले. मात्र सुरक्षारक्षकांनी नार्वेकरांना सभागृहात कसे सोडले? असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे.
दरम्यान, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी नार्वेकर यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. मिलिंद नार्वेकर यांची अनेक वर्षांपासून आमदार होण्याची इच्छा आहे. पण उद्धव ठाकरेंनी त्यांना आमदार बनवले नाही असं म्हणत मिलिंद नार्वेकर आमच्या संपर्कात आहेत असा दावा संजय शिरसाठ यांनी केला.