भाजप कार्यालयासमोर राणेंच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक; पोस्टरवर शाई फेकल्याच्या घटनेचा केला निषेध

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली | आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर असलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या होल्डिंगवर सकाळी कार्यालय बंद असताना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली. याच्या निषेधार्थ आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालया समोर सदर घटनेचा निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक घातला व संबंधित शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कारवाई करण्याबाबतची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शिवसेनेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी संघटक सरचिटणीस दीपक माने, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज सूर्यवंशी, ओबीसी मोर्चा अध्यक्ष अमर पडळकर, सचिव विश्वजीत पाटील, सरचिटणीस केदार खाडिलकर, गटनेते विनायक सिंहासने, संजय यमगर, संजय कुलकर्णी, कृष्णा राठोड, रघुनाथ सरगर, अमित गडदे, गणपती साळुंखे, प्रियानंद कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.