औरंगाबाद | क्रेडिट कार्ड बंद करायचे अमिष दाखवून एका मुलीने शिक्षकेच्या कार्डचा वापर करत तब्बल पावणेदोन लाख रुपयांची ऑनलाईन खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. जून महिन्यात हा प्रकार घडला या प्रकरणी शिक्षकेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. सुनंदा भास्कर बनसोडे (रा. विद्यानगर) असे फसवणूक झालेल्या शिक्षकेचे नाव आहे. बनसोडे यांच्याकडे एसबीआय बँकेचे क्रेडिट असून त्याची मर्यादा 1 लाख 88 हजार चारशे रुपये इतकी आहे बनसोडे यांना एक जून रोजी त्यांच्या मोबाईल वर कॉल आला.
समोरील मुलीने अंकिता नाव सांगितले तुम्हाला क्रेडिट कार्ड बंद करायचे आहे? का असे विचार ना बनसोडे यांना केली त्यांनी हो म्हटल्याने त्या मुलीने त्यांची जन्मतारीख कार्ड नंबर व पत्ता याची माहिती मिळवली, आता कार्ड बंद होईल त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल ते सांगा असे मुलीने सांगितले. विश्वास ठेवत बनसोडे यांनी मोबाईल वर आलेला ओटीपी तिला सांगितला दरम्यान 12 जुलै रोजी पगार झाल्यावर क्रेडिट कार्डचे 22 हजार 792 रुपये कपात झाल्याचा मेसेज बनसोडे यांना आला.
आपण कार्ड बंद केल्यावर पैसे कसे कपात झाले. याची विचारपूस करण्यासाठी बनसोडे यांनी एक जूनला आलेल्या त्या क्रमांकावर कॉल केला. मात्र कोणीही प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांनी तातडीने बँकेत जाऊन विचारपूस केली तेव्हा त्या मुलीने त्यांच्या मोबाईलवर आलेला ओटीपी मिळवून 1 ते 3 जून या काळात एक लाख 71 हजार 233 रुपयाची ऑनलाईन खरेदी केल्याचे उघड झाले. या प्रकरणी बनसोडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.